[t4b-ticker]
ब्रेकिंग

मतदार यादी दुरुस्तीची संधी; मुंबईत चार दिवस विशेष शिबिरे

१९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला सर्व विधानसभा मतदारसंघांत शिबिरे; नाव नोंदणी, दुरुस्ती आणि वगळणीची सुविधा

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी/मुंबई, 

: मतदार यादीत नाव नाही, नाव किंवा पत्त्यात काही चूक आहे अथवा एखाद्या मृत किंवा स्थलांतरित व्यक्तीचे नाव वगळायचे आहे? मुंबईकरांना आता त्यासाठी थेट विशेष शिबिरात कार्यवाही करता येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

विशेष सखोल पुनरीक्षणाअंतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना तसेच यादीतील नोंदींबाबत आक्षेप किंवा दुरुस्ती असलेल्या मतदारांना ३० सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. या प्रक्रियेला वेग देण्यासाठी चार दिवस विशेष शिबिरे घेण्यात येणार आहेत.

नवमतदारांसाठीही मोठी संधी

१ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. प्रारूप यादीत नाव समाविष्ट झाले नसलेल्या पात्र नागरिकांनाही या शिबिरांमध्ये नाव नोंदणी करता येणार आहे.

गैरहजर, स्थलांतरित किंवा अन्य कारणांमुळे प्रारूप यादीत नाव राहून गेलेल्या नागरिकांनीही आपल्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणाहून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी दावे दाखल करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

एका शिबिरात तीन महत्त्वाची कामे

विशेष शिबिरांमध्ये मतदारांना प्रामुख्याने तीन प्रकारच्या कार्यवाही करता येणार आहे—

  • नाव नोंदणी : पात्र नवमतदार किंवा प्रारूप यादीत नाव नसलेल्या नागरिकांसाठी नमुना क्रमांक ६.
  • नोंदीत दुरुस्ती : मतदाराच्या तपशीलातील दुरुस्ती, दिव्यांगत्वाची नोंद किंवा स्थलांतरासाठी नमुना क्रमांक ८.
  • नाव वगळणे : मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७.

हे अर्ज संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ यांच्याकडून उपलब्ध करून घेता येतील.

ऑनलाइन अर्जाचीही सुविधा

मतदारांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या ‘व्होटर्स’ संकेतस्थळाचा किंवा ‘ईसीआयनेट’ मोबाइल अॅपचा वापर करता येईल.

मुंबईतील जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी विशेष शिबिरांचा लाभ घेऊन मतदार यादीतील आपले नाव आणि तपशील तपासावेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128