[t4b-ticker]
ब्रेकिंग

दहिसर-भाईंदर जोड रस्त्याच्या कामाला वेग; डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य

६० पाइल, ५ पाइल कॅप आणि ४ पिअरचे काम पूर्ण; ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात लाँचिंग गर्डरचे काम सुरू होणार

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

विशेष प्रतिनिधी | मुंबई

मुंबई आणि मिरा-भाईंदरदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या दहिसर-भाईंदर जोडरस्त्याच्या कामाला आता वेग देण्यात आला आहे. मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पातील अंतिम टप्पा असलेल्या या जोडरस्त्याचे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रकल्पस्थळाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.

५.१३५ किमीचा महत्त्वाकांक्षी जोडरस्ता

दहिसर पश्चिम ते भाईंदर पश्चिम यांच्यात थेट आणि जलद संपर्क निर्माण करणारा हा जोडरस्ता सुमारे ५.१३५ किलोमीटर लांबीचा आहे. प्रकल्पामध्ये उन्नत मार्ग, खारफुटी क्षेत्रातील खांबांवरील रस्ता, खाडीवरील उन्नत संरचना, खारपाण जमीन क्षेत्रावरील उन्नत मार्ग, वाहतूक विखुरण्यासाठी जोडमार्ग, आंतरबदल आणि उड्डाणपूल अशा विविध अभियांत्रिकी संरचनांचा समावेश आहे.

या प्रकल्पातील सुमारे ३.८३ किलोमीटर लांबीचा आणि ४५ मीटर रुंदीचा मुख्य उन्नत मार्ग हा मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाचा अंतिम भाग आहे.

६० पाइल आणि ४ पिअरचे काम पूर्ण

भाईंदर आंतरबदल परिसरातील प्रकल्पस्थळाची पाहणी करताना बांगर यांनी सुरू असलेल्या पायाभूत कामांचा आढावा घेतला. सध्या गॅबियन भिंतीचे कुंपण उभारण्याचे काम सुरू आहे. पुलाच्या पायाभरणीसाठी पाइल टाकण्याचे आणि त्यावर पाइल कॅप उभारण्याचे कामही वेगाने सुरू आहे.

आतापर्यंत ६० पाइल, ५ पाइल कॅप आणि ४ पिअरचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय पिअर कॅप आणि ९ सेगमेंटचे काम पूर्ण करण्यात आले आहे. प्रकल्पस्थळी अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असून तात्पुरता प्रवेश पूलही कार्यान्वित करण्यात आला आहे.

ऑक्टोबरमध्ये लाँचिंग गर्डरची सुरुवात

प्रकल्पाच्या पुढील महत्त्वाच्या टप्प्यात ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाँचिंग गर्डरचे काम सुरू करण्यात येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.

भूसंपादनाला प्राधान्य; कामात दिरंगाई नको

प्रकल्पासाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करून काम करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच विविध शासकीय प्राधिकरणे आणि मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आवश्यक सहकार्य घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

काम सुरू असताना सुरक्षेच्या प्रमाणित कार्यप्रणालीचे (एसओपी) काटेकोर पालन, कार्यस्थळी पुरेसे बॅरिकेडिंग आणि बांधकामाच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले.

डिसेंबर २०२८ची अंतिम मुदत

दहिसर-भाईंदर जोडरस्ता मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाचा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे कामाचा दर्जा आणि सुरक्षितता कायम ठेवत निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश बांगर यांनी दिले. डिसेंबर २०२८ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यानुसार नियोजन आणि अंमलबजावणी करण्यास त्यांनी स्पष्ट केले.

हा जोडरस्ता पूर्ण झाल्यानंतर दहिसर पश्चिम आणि भाईंदर पश्चिमदरम्यान थेट संपर्क निर्माण होऊन मुंबई-मिरा-भाईंदर परिसरातील वाहतुकीला मोठी गती मिळण्याची अपेक्षा आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128