[t4b-ticker]
ब्रेकिंग

कचरा टाकताच ‘एआय कॅमेऱ्या’तून स्वच्छतेचा संदेश! मुंबईत कचऱ्याच्या ठिकाणांवर नजर; नियम मोडणाऱ्यांना तत्काळ ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना

माहीमच्या गजानन वाटिकेत ‘जी उत्तर’ विभागाचा प्रायोगिक उपक्रम; यशस्वी ठरल्यास मुंबईत विस्तार

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी/ मुंबई :

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याच्या सवयीला आळा घालण्यासाठी आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) मदत घेतली आहे. कचरा टाकण्यासाठी एखादी व्यक्ती संभाव्य कचराकुंडीविरहित ठिकाणी येताच एआय कॅमेरा तिच्या हालचाली टिपतो आणि जोडलेल्या ध्वनिक्षेपकाद्वारे तत्काळ स्वच्छतेचा संदेश देतो. माहीम येथील गजानन वाटिका परिसरात महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागाने हा अभिनव प्रयोग सुरू केला आहे.
कचरा टाकण्यापूर्वीच मिळणार सूचना
मोठ्या प्रमाणात कचरा साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांना (Garbage Vulnerable Points) कचऱ्यापासून मुक्त ठेवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गजानन वाटिका परिसरात बसविण्यात आलेला एआय कॅमेरा कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीच्या हालचाली टिपतो. त्यानंतर ध्वनिक्षेपकाद्वारे परिसर स्वच्छ ठेवण्याचे आणि उघड्यावर कचरा न टाकण्याचे आवाहन केले जाते. या तत्काळ सूचनेमुळे संबंधित व्यक्ती कचरा टाकण्यापासून परावृत्त होईल आणि परिसरातील अस्वच्छता रोखण्यास मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे.
प्रयोग यशस्वी झाल्यास मुंबईभर विस्तार
नागरिकांच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे, सार्वजनिक स्वच्छतेबाबत जागरूकता वाढविणे आणि कचरा साचण्याची संभाव्य ठिकाणे स्वच्छ ठेवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रयोगाच्या परिणामकारकतेचा आढावा घेतल्यानंतर मुंबईतील अन्य ठिकाणीही ही यंत्रणा बसविण्याचा महानगरपालिकेचा विचार आहे.
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. उपआयुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे आणि सहायक आयुक्त (जी उत्तर विभाग) योगेश देसाई यांच्या पुढाकारातून हा प्रायोगिक उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
महानगरपालिकेने नागरिकांना रस्त्यांवर, उघड्यावर किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन केले आहे. मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128