[t4b-ticker]
ब्रेकिंग

GMLR मध्ये ‘तुळशी’ने सुरू केले बोगद्याचे खोदकाम

५.३० किमी लांबीच्या दुहेरी बोगद्याचे काम वेगाने, बांगर यांनी दिले सुरक्षेचे कडक निर्देश

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी/ मुंबई :

गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (GMLR) प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातील (ब) कामाने आता निर्णायक वेग पकडला आहे. गोरेगाव पूर्व येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड पश्चिम येथील अमर नगरदरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली ‘तुळशी’ या टनेल बोरिंग मशीनद्वारे (TBM) ५.३० किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्यांचे खोदकाम सुरू झाले आहे. या दोन्ही बोगद्यांना प्रत्येकी तीन मार्गिका असतील. पहिले TBM १७ ऑगस्ट रोजी कार्यान्वित करण्यात आले होते.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी बुधवारी सकाळी प्रकल्पस्थळाची पाहणी केली. त्यांनी बोगदा खोदकामाची कार्यपद्धती, यंत्रणेची कार्यक्षमता, सुरू असलेले काम आणि तांत्रिक बाबींची माहिती घेतली. पाहणीदरम्यान सुरक्षितता, बांधकामाची गुणवत्ता आणि निर्धारित कालमर्यादेत काम पूर्ण करण्याच्या नियोजनावर विशेष भर देण्यात आला.

प्रत्यक्ष खोदकाम सुरू झाल्याने GMLR प्रकल्पाने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. सध्या ९ मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. कामाचा वेग कायम ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात आणि गरज भासल्यास अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश बांगर यांनी दिले.

बोगदा खोदकाम अत्यंत तांत्रिक आणि आव्हानात्मक असल्याचे सांगत त्यांनी कामगारांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. सुरक्षा नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

दुसऱ्या TBMच्या जुळवाजुळवीचे (Assembly) कामही ७० टक्के पूर्ण झाले आहे. बांगर यांनी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत संपूर्ण जुळवाजुळवीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यंत्रणा पूर्णपणे स्थापित झाल्यानंतर तिची कार्यक्षमता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी १ ऑक्टोबरपासून Site Acceptance Test (SAT) सुरू करण्यास सांगितले आहे.

SATनंतर प्रत्यक्ष बोगदा खोदकामाच्या पुढील टप्प्याचे नियोजन केले जाणार आहे. म्हणजेच, एका बाजूला पहिले TBM जमिनीखाली पुढे सरकत असताना दुसरी यंत्रणाही निर्धारित वेळेत तयार करून प्रकल्पाचा वेग वाढवण्याची तयारी सुरू आहे.

यावेळी प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि सल्लागार उपस्थित होते.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली तयार होणारे हे ५.३० किमी लांबीचे दुहेरी बोगदे GMLR प्रकल्पातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येकी तीन मार्गिका असलेल्या या दोन्ही बोगद्यांमुळे गोरेगाव-मुलुंडदरम्यानची वाहतूक कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारण्याची अपेक्षा आहे. आता निर्धारित कालमर्यादेत सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण खोदकाम पूर्ण करण्याचे आव्हान आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128