[t4b-ticker]
ब्रेकिंग

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या राख्यांना मुंबईकरांची मनापासून दाद; दोन दिवसांत २ हजारांहून अधिक राख्यांची विक्री

विक्रीतून जमा झालेले ५१ हजार १९० रुपये विद्यार्थ्यांनाच भेट; मेहनतीला मिळाले प्रोत्साहनाचे अनमोल बळ

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी/ मुंबई :

रक्षाबंधनाच्या निमित्ताने दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या राख्यांना मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विशेष शाळांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या २ हजार ५२ राख्यांची दोन दिवसांत विक्री झाली. राख्या आणि इतर वस्तूंच्या विक्रीतून ५१ हजार १९० रुपये जमा झाले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या मेहनतीतून मिळालेली ही संपूर्ण रक्कम त्यांनाच भेट म्हणून देण्यात आली. त्यामुळे आर्थिक मदतीपेक्षा मोठे असे ‘आपल्या कलेला आणि मेहनतीला किंमत आहे’ हे आत्मविश्वासाचे बळ विद्यार्थ्यांना मिळाले.
महानगरपालिका मुख्यालयासह विविध प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या विशेष राखी प्रदर्शनाला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भावंडांसाठी राखी खरेदी करण्यास आलेल्या नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या हातची राखी आवडीने घेतलीच, शिवाय त्यांच्या कलाकौशल्याचे कौतुकही केले.
दोन दिवसांत २,०५२ राख्यांची विक्री
दिनांक २४ ऑगस्ट रोजी १,२९९ राख्यांची, तर २५ ऑगस्ट रोजी ७५३ राख्यांची विक्री झाली. पहिल्या दिवशी इतर वस्तूंसह ३१ हजार ४७५ रुपये, तर दुसऱ्या दिवशी १९ हजार ७१५ रुपये जमा झाले. अशा प्रकारे दोन दिवसांत एकूण ५१ हजार १९० रुपयांची विक्री झाली.
महानगरपालिका मुख्यालयात एस. जी. बारवे, लायन्स जुहू सेंटर आणि नारे पार्क या विशेष शाळांमधील विद्यार्थ्यांनी राख्यांच्या विक्रीत सहभाग घेतला. तसेच एम/पूर्व, डी, एफ/दक्षिण, जी/दक्षिण, जी/उत्तर, एच/पूर्व, एच/पश्चिम, के/पश्चिम, पी/दक्षिण, आर/दक्षिण, आर/मध्य, एफ/उत्तर, एल, एन, एस, टी आणि एम/पश्चिम या प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्येही विविध विशेष शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
राखी विकली, आत्मविश्वास वाढला!
या उपक्रमाचे खरे वैशिष्ट्य केवळ राख्यांची विक्री नव्हे, तर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या वस्तूंचे मूल्य प्रत्यक्ष अनुभवणे हे ठरले. नागरिकांनी त्यांच्या कलाकृती खरेदी केल्याचे पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान या उपक्रमाचे सर्वात मोठे यश ठरले.
राखीच्या प्रत्येक धाग्यात विद्यार्थ्यांची कल्पकता, मेहनत आणि आत्मविश्वास गुंफलेला होता. मुंबईकरांच्या खरेदीने या धाग्याला प्रोत्साहनाची जोड मिळाली.
कलागुणांना व्यासपीठ, स्वावलंबनाला दिशा
महानगरपालिका शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षा मीनल तुर्डे यांच्या संकल्पनेतून आणि नियोजन विभागाच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासोबतच महानगरपालिकेच्या विशेष शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ, कलागुणांना प्रोत्साहन आणि स्वावलंबनाला दिशा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
रक्षाबंधनाची राखी यंदा केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा धागा ठरली नाही, तर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कष्ट, कौशल्य आणि आत्मविश्वासाची ओळख बनली. संधी मिळाल्यास प्रत्येक हात काहीतरी सुंदर आणि मौल्यवान घडवू शकतो, याचीच प्रचिती या उपक्रमातून मुंबईकरांना आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128