[t4b-ticker]
ब्रेकिंग

दहीहंडीला UNESCOच्या जागतिक वारसा यादीत नेणार; गोविंदांना स्पेनलाही पाठवणा

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा; ‘उत्सवांवर बंदी आणण्याची भूमिका मान्य नाही’

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

मुंबई, प्रतिनिधी

: महाराष्ट्राच्या पारंपरिक दहीहंडी उत्सवाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असून, दहीहंडी उत्सवाला UNESCOच्या जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच महाराष्ट्रातील गोविंदांना स्पेनलाही पाठवणार आहोत, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी रविवारी केली. उत्सव साजरा करताना सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी दहीहंडी मंडळांना केले.

महाराष्ट्रातील दहीहंडी पथके, गोविंदा आणि या उत्सवासाठी कार्यरत विविध संघटनांच्या सहभागातून स्थापन झालेल्या ‘महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन’च्या वतीने परळ येथील राष्ट्रीय मजदूर मिल संघ, मजदूर मंदिर येथे आयोजित ‘कृष्णानंद सोहळ्या’त ते बोलत होते. कार्यक्रमाला असोसिएशनचे अध्यक्ष बाळा पडेलकर, कार्याध्यक्ष सुरेंद्र पांचाळ, सचिव गीता झगडे, अभिषेक सुर्वे यांच्यासह राज्यातील महिला व पुरुष दहीहंडी पथके, गोविंदा आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘सुरक्षा महत्त्वाची; नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या’

दहीहंडी उत्सवाचे नियोजन अधिक शिस्तबद्ध पद्धतीने करणे, गोविंदांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह वाढविणे, या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामूहिक श्रीकृष्ण आरतीही करण्यात आली.

दहीहंडी पथकांनी सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करावे, आवश्यक खबरदारी घ्यावी, रहदारी व वाहतुकीचे नियम पाळावेत, तसेच पादचारी आणि नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. उत्सवाचा आनंद सुरक्षित वातावरणात घ्यावा, असे आवाहन शेलार यांनी केले.

‘गोविंदांची लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढलो’

यावेळी शेलार यांनी दहीहंडीतील गोविंदा पथकांना सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा का आणि कसा द्यावा लागला, याचा संदर्भ देत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचा उल्लेख केला. सरकारने न्यायालयात ठाम भूमिका मांडल्यामुळे ही लढाई जिंकता आली, असे ते म्हणाले.

‘उत्सवांवर बंदीच्या दिशेने नेणारी भूमिका मान्य नाही’

शेलार यांनी यावेळी विविध पारंपरिक उत्सवांवरील निर्बंधांच्या मागण्यांवरून थेट टीका केली. गणेशमूर्तींचे विसर्जन, मूर्तींचे साहित्य, गणेशोत्सवातील मंडप व ध्वनी परवानग्या, नागपंचमीतील पारंपरिक खेळ तसेच दहीहंडीतील थर, उंची, वय आणि आयोजन यावर सातत्याने निर्बंधांची मागणी केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

“पर्यावरण, नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीची चिंता नक्कीच केली पाहिजे. मात्र, निर्बंध लावत-लावत आपल्या उत्सवांना बंदीच्या दिशेने नेणारी भूमिका मान्य नाही,” असे शेलार यांनी ठणकावले. अन्य धर्म-पंथांविषयी आपल्याला भाष्य करायचे नसून, त्यांच्या उत्सवांना जशी मुभा आहे तशीच आपल्या उत्सवांनाही असली पाहिजे, असे ते म्हणाले.

‘शहरी नक्षलवादाशी जोडले आहेत का?’

“मराठी मातीतल्या आणि मराठी माणसाच्या हिंदू सणांवर रोक लावण्याची भूमिका सातत्याने दिसत आहे. अशा प्रकारच्या मर्यादा आणि बंदी आणण्यापर्यंत भूमिका मांडणारी ही लोकं शहरी नक्षलवादाशी जोडली आहेत का, हा माझा थेट आरोप आहे,” असे शेलार यांनी म्हटले.

उत्सवांमध्ये आवश्यक ती काळजी आणि सुरक्षिततेचे नियम पाळण्याची भूमिका सरकारची आहे; मात्र पारंपरिक उत्सवांवर बंदी आणण्याची भूमिका स्वीकारली जाणार नाही. महाराष्ट्रातील पारंपरिक आणि हिंदू सणांची बाजू सर्व आवश्यक खबरदारीसह घेण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारली आहे, असेही शेलार यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128