[t4b-ticker]
ब्रेकिंग

मुंबईतील पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी आयुक्त अश्विनी भिडे मैदानात; तीन तास शहरातील विविध भागांची पाहणी

अधिकृत फेरीवाल्यांनी परवान्यातील जागेतच व्यवसाय करावा; अतिक्रमण आढळल्यास कठोर कारवाईचे निर्देश

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी/मुंबई :

मुंबईतील पदपथ पादचाऱ्यांसाठी पूर्णपणे अडथळामुक्त आणि सुरक्षित करण्यासाठी महापालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी सोमवारी सकाळी तब्बल तीन तासांहून अधिक वेळ शहरातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना त्यांनी पदपथांवरील अतिक्रमणे, फेरीवाल्यांची स्थिती, दुरुस्ती, सुशोभीकरण आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले.
आयुक्त भिडे यांनी ‘डी’ विभागातील नाना चौक, ग्रँट रोड रेल्वे स्थानक, नौशीर भरुचा छेद गल्ली, शंकरशेट मार्गावरील भाजी गल्ली आणि ताडदेव मार्ग; ‘ई’ विभागातील डॉ. आनंदराव नायर मार्ग, बा. य. ल. नायर रुग्णालय परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, नाथ पै मार्ग आणि संत सावता मार्ग; ‘बी’ विभागातील लोकमान्य टिळक मार्ग, सिंदूर पूल, जुना बंगालीपुरा गल्ली, रघुनाथ महाराज स्ट्रीट आणि काझी सय्यद मार्ग; ‘सी’ विभागातील जगन्नाथ शंकरशेट मार्ग, धोबीतलाव गल्ली, महर्षी कर्वे मार्ग, मरीन लाईन्स व चंदनवाडी, तर ‘ए’ विभागातील महात्मा जोतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट) आणि महापालिका मार्ग परिसराची पाहणी केली.
फेरीवाल्यांना ‘परवान्याच्या जागेतच’ व्यवसायाची ताकीद
ग्रँट रोड रेल्वे स्थानक, जगन्नाथ शंकरशेट मेट्रो स्थानक आणि नायर रुग्णालय परिसरात पादचाऱ्यांना ये-जा करताना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. यावेळी त्यांनी पदपथांवरील अधिकृत फेरीवाल्यांच्या परवान्यांचीही प्रत्यक्ष तपासणी केली.
‘परवाना आहे म्हणून पदपथावर मनमानी जागा वापरता येणार नाही,’ अशी स्पष्ट भूमिका घेत आयुक्तांनी परवान्यात निश्चित केलेल्या क्षेत्रफळातच व्यवसाय करण्याचे निर्देश दिले. निर्धारित क्षेत्रफळापेक्षा अधिक जागा अडवणाऱ्या फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करावी, असे त्यांनी अनुज्ञापन विभागाला सांगितले. सर्व परवानाधारक फेरीवाल्यांकडून प्रत्यक्षात किती जागा वापरली जात आहे, याची तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले.
पदपथांवरील सर्व प्रकारचे अडथळे दूर करून ते पादचाऱ्यांसाठी सुलभ करावेत. त्याचबरोबर पदपथांची दुरुस्ती, सुधारणा, सुशोभीकरण आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
कचरा टाकणाऱ्यांवरही नजर
पदपथांच्या पाहणीसोबतच आयुक्त भिडे यांनी ‘ई’ विभागातील सुका कचरा संकलन केंद्र, रे रोड येथील घनकचरा व्यवस्थापन विभागाची चौकी आणि संत सावता मार्गावरील उदंचन केंद्राला भेट दिली. शहरातील मोठ्या प्रमाणात कचरा साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांची (Garbage Vulnerable Points – GVPs) देखील त्यांनी पाहणी केली.
कचरा टाकण्याच्या ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले. सुका कचरा वर्गीकरण केंद्रांची रचना अधिक योग्य पद्धतीने करावी आणि वर्गीकरण केलेल्या कचऱ्याचा प्रकार संबंधित थैलीच्या दर्शनी भागावर स्पष्टपणे नमूद करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
‘पादचारी प्रथम’च्या कामाबाबत समाधान; मात्र परिणाम दिसायला हवा
मुंबईत ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. मात्र, केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता त्याचा प्रत्यक्ष परिणाम पादचाऱ्यांना पदपथांवर दृश्य स्वरूपात जाणवला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
“पादचाऱ्यांना पदपथांवरील बदल स्पष्टपणे जाणवतील, अशा पद्धतीने अधिक प्रभावी उपाययोजना करा,” असे निर्देश आयुक्त भिडे यांनी संबंधित विभागांना दिले.
या पाहणीदरम्यान उपायुक्त (परिमंडळ-१) चंदा जाधव, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, सहायक आयुक्त (डी विभाग) योगेश साळुंके, सहायक आयुक्त (ई विभाग) आनंद कंकाळ, सहायक आयुक्त (बी विभाग) जितेंद्र घोराडे, सहायक आयुक्त (ए विभाग) उज्ज्वल इंगोले, सहायक आयुक्त (सी विभाग) सुनील माने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128