[t4b-ticker]
ब्रेकिंग

कुर्ल्यात भूस्खलनाची भीषण दुर्घटना; सहा जणांचा मृत्यू, चार जखमी

महापौर रितू तावडे घटनास्थळी; मृतांच्या वारसांना ४ लाख, जखमींना ५० हजारांची मदत जाहीर

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी /मुंबई :

´कुर्ला पश्चिमेतील अशोक नगर, टेकडी क्रमांक ३ येथे बुधवारी पहाटे भीषण भूस्खलनाची दुर्घटना घडली. डोंगरउतारावरील माती व ढिगारा २ ते ३ घरांवर कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याची पाहणी केली. त्यांनी पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करत संबंधित यंत्रणांना बचावकार्य अधिक वेगाने आणि समन्वयाने राबविण्याचे निर्देश दिले.
महापौरांनी या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपये, तर जखमींना उपचारासाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
चार जखमींची प्रकृती स्थिर
कुर्ला येथील भाभा रुग्णालयात चार जखमींना दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये सोहेल अन्सारी (१८) याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तसेच मोहम्मद अन्सारी (१४), नईमुद्दीन इक्बाल खान (२८) आणि साजिद अन्सारी (१६) यांच्यावर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
सहा जणांना मृत घोषित
राजावाडी रुग्णालयात आणण्यात आलेल्या सहा जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृतांमध्ये मोहम्मद समीर अन्सारी (१४), साहिल हुसेन अब्दुल काझी (१९), अंदाजे ४५ वर्षीय अनोळखी व्यक्ती, अबान आरिफ शेख (२), मनत आरिफ शेख (४) आणि मरजिना आरिफ शेख (२७) यांचा समावेश आहे.
बचावकार्याला अरुंद मार्गाचे आव्हान
दुर्घटना घडलेली जागा अत्यंत डोंगराळ आणि तेथे जाणारा मार्ग इतका अरुंद आहे की, काही ठिकाणी एकावेळी केवळ एका व्यक्तीलाच जाता येते. त्यामुळे बचाव पथकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी, मुंबई अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल (NDRF), मुंबई पोलिस, १०८ रुग्णवाहिका आणि अन्य यंत्रणा घटनास्थळी तैनात असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष विजयेंद्र शिंदे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, एल विभागाचे सहायक आयुक्त (प्रभारी) अनिल जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128