[t4b-ticker]
ब्रेकिंग

महापौर बंगल्याच्या निविदेवरून वाद; रितू तावडे यांचे स्पष्ट स्पष्टीकरण – ‘माझा काडीमात्र संबंध नाही’

महापौर बंगल्यासाठी नव्हे, तर प्राणिसंग्रहालय परिसरातील देखभाल कामांसाठीच निविदा'; माध्यमांतील वृत्तांनंतर महापौर कार्यालयाची भूमिका

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

मुंबई | प्रतिनिधी

महापौरांच्या अधिकृत निवासस्थानासाठी नव्याने निविदा काढल्याच्या वृत्तावरून निर्माण झालेल्या चर्चेनंतर अखेर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. संबंधित निविदेचा महापौर किंवा महापौर निवासस्थानाशी कोणताही संबंध नसून, ती संपूर्ण प्रक्रिया प्राणिसंग्रहालय परिसरातील देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी आहे, असे महापौर कार्यालयाने बुधवारी स्पष्ट केले.

महापौर कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापौरांचे अधिकृत निवासस्थान वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय परिसरात असले तरी संपूर्ण परिसरातील देखभाल, दुरुस्ती आणि परिरक्षणाची जबाबदारी संबंधित उद्यान व प्राणिसंग्रहालय विभागाची आहे. त्यामुळे काढण्यात आलेली निविदा ही त्या विभागाच्या नियमित प्रशासकीय कामकाजाचा भाग आहे.

याशिवाय महापौरांचे निवासस्थान हे हेरिटेज इमारत असल्याने त्यासंबंधित कामे स्वतंत्र हेरिटेज मेंटेनन्स विभागामार्फत केली जातात. सध्या चर्चेत असलेली निविदा या विभागाने काढलेली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

महापौर कार्यालयाने आणखी एक महत्त्वाचा खुलासा करताना सांगितले की, संबंधित निविदेतील प्रस्तावित कामे महापौर बंगल्याच्या आतील नसून प्राणिसंग्रहालयाच्या परिसरातील आहेत. या निविदेबाबत महापौरांना कोणतीही माहिती नव्हती, त्यांनी अशा कोणत्याही कामांची मागणी केलेली नाही आणि निविदा प्रक्रियेत त्यांचा कोणताही सहभाग नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, निविदा प्रक्रिया संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांनी प्रशासकीय नियमांनुसार हाताळली असून, कामाची आवश्यकता आणि प्रक्रिया याबाबत सर्व माहिती त्यांच्याकडे आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेशी महापौरांचा संबंध जोडून चुकीचा समज निर्माण करू नये, असे आवाहन महापौर कार्यालयाने केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128