[t4b-ticker]
ब्रेकिंग

जोगेश्वरीला अत्याधुनिक प्रसूतीगृहाची भेट; ५० खाटांमुळे हजारो माता-बालकांना दिलासा महापौर रितू तावडे यांच्या हस्ते लोकार्पण;

मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी होणार, २४ तास प्रसूती व नवजात शिशु सेवा उपलब्ध

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]


मुंबई | प्रतिनिधी
जोगेश्वरी (पश्चिम) परिसरातील गर्भवती माता आणि नवजात बालकांसाठी मोठा दिलासा देणारे अत्याधुनिक ओशिवरा प्रसूतीगृह अखेर नागरिकांच्या सेवेत दाखल झाले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने कॅप्टन सामंत मार्गावर उभारलेल्या या ५० खाटांच्या सुसज्ज प्रसूतीगृहाचे लोकार्पण बुधवारी महापौर रितू तावडे यांच्या हस्ते झाले. विशेष म्हणजे लोकार्पणानंतर लगेचच हे प्रसूतीगृह नागरिकांसाठी कार्यान्वित करण्यात आले.
यावेळी बोलताना महापौर रितू तावडे यांनी, “हे केवळ प्रसूतीगृह नसून सुरक्षित मातृत्व आणि नवजात बालकांच्या निरोगी भविष्यासाठी उभारलेले विश्वासाचे केंद्र आहे. प्रत्येक गर्भवती महिलेला वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. स्थानिक स्तरावर आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्यामुळे माता-बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मोठी मदत होईल,” असे सांगितले.

हजारो कुटुंबांना थेट लाभ
जोगेश्वरी (पश्चिम), आदर्श नगर, बेहराम बाग, गौतम नगर, शास्त्री नगर आणि आसपासच्या परिसरातील हजारो नागरिकांना या प्रसूतीगृहाचा थेट लाभ मिळणार आहे. त्यामुळे गर्भवती महिलांना उपचारांसाठी दूरच्या रुग्णालयांमध्ये धावपळ करावी लागणार नाही. याचबरोबर महानगरातील मोठ्या सरकारी रुग्णालयांवरील रुग्णभार कमी होण्यासही मदत होणार आहे.


जुन्या इमारतीऐवजी आधुनिक सुविधा
जुनी ओशिवरा प्रसूतीगृहाची इमारत जीर्ण झाल्यानंतर येथील सेवा तात्पुरत्या स्वरूपात टोपीवाला प्रसूतीगृहात हलविण्यात आल्या होत्या. आता सुविधा भूखंडावर तळमजला अधिक तीन मजली अत्याधुनिक इमारतीत नव्याने उभारण्यात आलेले हे प्रसूतीगृह सर्व आधुनिक वैद्यकीय सुविधांनी सज्ज असून पूर्ण क्षमतेने सेवा देण्यासाठी तयार आहे.
५० खाटांची सुसज्ज व्यवस्था
नवीन प्रसूतीगृहात एकूण ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये ३४ खाटा स्त्रीरोग व प्रसूती विभागासाठी, १० खाटा बालरोग विभागासाठी आणि ६ खाटा विशेष नवजात शिशु अतिदक्षता विभागासाठी (SNCU) राखीव ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय सुसज्ज ऑपरेशन थिएटर, ओपीडी, आयपीडी आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची सुविधा उपलब्ध आहे.
२४ तास तज्ज्ञांची सेवा
या प्रसूतीगृहात स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ सेवा, सुरक्षित प्रसूती, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची काळजी, नवजात शिशु उपचार, कुटुंब नियोजन, लसीकरण आणि माता-बाल आरोग्य समुपदेशन अशा सर्वसमावेशक सेवा उपलब्ध राहणार आहेत. एक वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, दोन स्त्रीरोग तज्ज्ञ, एक बालरोग तज्ज्ञ आणि प्रशिक्षित परिचारिकांचे पथक २४ तास सेवेसाठी तैनात राहणार आहे.
लोकार्पण सोहळ्यास स्थानिक आमदार हारून खान, सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे, नगरसेवक रुपेश सावरकर, विठ्ठल बंधिरे, नगरसेविका सुधा सिंग तसेच महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर, परिचारिका आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर मान्यवरांनी प्रसूतीगृहातील विविध विभागांची पाहणी करून उपलब्ध सुविधांची माहिती घेतली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128