[t4b-ticker]
ब्रेकिंग

एसटी प्रवास महागला! मध्यरात्रीपासून भाड्यात 13.56% वाढ 

डिझेल, टायर, सुटे भाग, देखभाल खर्च आणि कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांतील वाढीचा परिणाम; साध्या बसवरील 10% हंगामी भाडेवाढ रद्द

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

विशेष प्रतिनिधी | मुंबई

राज्यातील लाखो एसटी प्रवाशांच्या खिशाला आता अधिक कात्री लागणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी भाड्यात 13.56 टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली असून, ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. वाढत्या इंधन खर्चासह वाहनांच्या देखभाल, टायर, सुटे भाग आणि कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांवरील वाढलेल्या खर्चामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

महामंडळाच्या माहितीनुसार, आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, वाहनांच्या देखभाल खर्चातील सातत्याने होणारी वाढ आणि कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ यामुळे एसटीच्या आर्थिक भारात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रवासी सेवा अखंड आणि दर्जेदार ठेवण्यासाठी भाडेवाढ अपरिहार्य ठरल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, यापूर्वी साध्या बससेवेवर लागू करण्यात आलेली 10 टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली असून, त्याऐवजी सर्व सेवांसाठी नवीन 13.56 टक्के दरवाढ लागू केली जाणार आहे.

राज्यात दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटी महामंडळावर वाढत्या खर्चामुळे आर्थिक ताण निर्माण झाला आहे. महामंडळाची आर्थिक शाश्वतता टिकवून ठेवणे, ताफ्याचे आधुनिकीकरण करणे आणि प्रवाशांना सुरक्षित व विश्वासार्ह सेवा सातत्याने उपलब्ध करून देणे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “भाडेवाढ निश्चित करताना प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. एसटीची सेवा अधिक सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वत करण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता. प्रवाशांनी नेहमीप्रमाणे एसटीवर विश्वास कायम ठेवावा,” असे आवाहन त्यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128