ब्रेकिंग
मुंबई महापालिकेच्या बालवाडी कर्मचाऱ्यांचा आज आझाद मैदानावर धडक मोर्चा
शिक्षक-मदतनीसांच्या मानधन, वेतन आणि सामाजिक सुरक्षेच्या मागण्यांनी आंदोलन पेटले; मनमानी पद्धतीने संस्था बदलण्यास संघटनेचा तीव्र विरोध
[wps_visitor_counter]
[responsivevoice_button voice="Hindi Female"]
[metaslider id="1367"]

प्रतिनिधी/मुंबई :
मुंबई महानगरपालिकेच्या बालवाड्यांमध्ये कार्यरत शिक्षक आणि मदतनीसांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी म्युनिसिपल मजदूर युनियनच्या वतीने गुरुवारी आझाद मैदानावर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. बालवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतनानुसार मानधन, सामाजिक सुरक्षा आणि सेवासवलती मिळाव्यात, तसेच त्यांच्या रोजगाराबाबत मनमानी पद्धतीने निर्णय घेऊ नयेत, अशी आक्रमक भूमिका युनियनने घेतली.
महापालिकेच्या बालवाड्या चालविण्यासाठी आरोग्य अभियानांतर्गत निवडलेल्या संस्थांना कधीही वेळेवर वेतन दिले जात नसल्याचा आरोप युनियनने केला. अशा संस्थांना रद्द करून सर्व बालवाड्या थेट महापालिकेमार्फत चालविण्यात याव्यात, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
किमान वेतनानुसार पगारवाढ द्या
बालवाडी शिक्षक आणि मदतनीसांना त्यांच्या कामाच्या तुलनेत अत्यल्प मानधन मिळत असल्याचा आरोप करत किमान वेतनानुसार पगारवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय सर्व बालवाडी शिक्षक व मदतनीसांना ईएसआयसी आणि ईपीएफचे लाभ तसेच सेवासवलती लागू कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
दिवाळीपूर्वी ‘भाऊबीज भेट’ देण्याची मागणी
बालवाडी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन यंदाच्या दिवाळीनिमित्त शिक्षक आणि मदतनीसांना एक महिन्याच्या वेतनाइतकी ‘भाऊबीज भेट’ देण्यात यावी, अशी मागणी युनियनने केली आहे. तसेच महापालिकेच्या बालवाडी शिक्षक व मदतनीसांना गणवेश आणि ओळखपत्रे देण्याची मागणीही करण्यात आली.
‘संस्था आमच्या मालक नाहीत’
आंदोलनादरम्यान संघटनेने संस्थांच्या कार्यपद्धतीवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. “संस्था आमच्या मालक नाहीत, त्यांना न घाबरता आंदोलनात सहभागी व्हा,” असा आक्रमक संदेश देत मोठ्या संख्येने बालवाडी शिक्षक आणि मदतनीस आंदोलनात सहभागी झाले.
बालवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी झालेल्या या आंदोलनामुळे महापालिका प्रशासनासमोर आता त्यांच्या वेतन, सामाजिक सुरक्षा आणि सेवास्थैर्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

[sp_wpcarousel id="1375"]