[t4b-ticker]
ब्रेकिंग

कोविड योद्ध्यांच्या मागण्यांसाठी महापौर मैदानात; १,७०० बाह्यस्रोत आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा

१० वर्षे सेवा झालेल्यांना कायम सेवेत घेण्याच्या धोरणाचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी, मुंबई : कोविड संकटाच्या काळात मुंबईकरांच्या आरोग्यासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानातील (NUHM) १,७०० हून अधिक बाह्यस्रोत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची दखल घेत मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी सोमवारी आझाद मैदानातील आंदोलनाला भेट दिली. आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी महानगरपालिका सकारात्मकपणे पाठपुरावा करेल, असे आश्वासन महापौरांनी दिले.
यावेळी नगरसेवक रोहिदास लोखंडे उपस्थित होते. आंदोलनाची दखल घेत महापौरांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांना सविस्तर पत्र पाठवून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
१० वर्षे सेवा झालेल्यांना कायम सेवेत घेण्याचा प्रस्ताव
महापौरांनी पत्रात १० वर्षे शासकीय सेवेत पूर्ण केलेल्या अनुभवी बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांना एकवेळच्या विशेष धोरणाद्वारे (वन टाइम पॉलिसी) नियमित सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. रिक्त पदांवर या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी सर्वंकष प्रस्ताव तयार करून तो महानगरपालिका आणि राज्य शासनाच्या मंजुरीसाठी सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
प्रशासकीय पातळीवर तयार असलेल्या प्रस्तावांना गती देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
थेट वेतनवाढीसह प्रसूती रजेची मागणी
कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन लागू करून त्याचा थेट लाभ देणे, महिला कर्मचाऱ्यांना हक्काची भरपगारी प्रसूती रजा देणे आणि दिवाळी सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत.
याशिवाय पीएफ आणि ईएसआयसीचे कायदेशीर लाभ वेळेत मिळावेत, याची खात्री करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

वेतन रखडवणाऱ्या कंत्राटदाराला तंबी
वेतन देण्यास विलंब करणाऱ्या मे. डी. एस. एंटरप्रायझेस या कंत्राटदार संस्थेला कडक समज देण्याचे निर्देशही महापौरांनी दिले आहेत. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी तातडीने सोडवण्यासाठी कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ‘तक्रार निवारण समिती’ कार्यान्वित करण्याचेही सांगण्यात आले आहे.
‘कोविड काळातील योगदान महानगरपालिका विसरलेली नाही’
आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना महापौर रितू तावडे म्हणाल्या, “कोविडच्या कठीण काळात या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करून मुंबईकरांची सेवा केली. त्यांच्या योगदानाची जाणीव महानगरपालिकेला आहे. त्यांच्या मागण्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष मार्गी लागाव्यात, यासाठी मी स्वतः शासन आणि महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे.”
महापौरांच्या भेटीनंतर आता या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासनाकडून कोणती ठोस कार्यवाही होते, याकडे आंदोलनकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128