[t4b-ticker]
ब्रेकिंग

चेंबूर-मानखुर्दला २४ तास पाणीपुरवठा विस्कळीत

तुर्भे जलाशयातील जलबोगदा कार्यान्वित करण्याचे काम; त्यानंतर सात दिवस कमी दाबाने पाणी

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

 

विशेष संवाददाता
मुंबई :

चेंबूर, मानखुर्द, वाशीनाका, देवनार, माहुलसह एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. तुर्भे निम्नस्तरीय जलाशय ते तुर्भे उच्चस्तरीय जलाशयादरम्यानचा जलबोगदा कार्यान्वित करण्याचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. या कामामुळे मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते बुधवार, ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत तब्बल २४ तास पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. त्यानंतरही पुढील सात दिवस काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिकेने व्यक्त केली आहे.
एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हे काम करण्यात येत आहे. जलबोगदा कार्यान्वित करण्यासाठी २४ तासांचे कामकाज हाती घेण्यात येणार असून, या कालावधीत संबंधित भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
त्यामुळे नागरिकांनी २४ तासांच्या कालावधीसाठी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि पुढील सात दिवस पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
एम पूर्व विभागातील प्रभावित परिसर
लल्लूभाई संकुल, कमला रमणनगर, रमण मामा नगर, शिवाजीनगर, लोटस वसाहत, गौतमनगर, गायकवाड नगर, अयोध्या नगर, वाशीनाका, मानखुर्द, बेंगणवाडी, भारत नगर, म्हाडा इमारती, चिता कॅम्प, साठेनगर, झाकीर हुसेन नगर, देवनार गाव व वसाहत, नवीन भारत नगर, हशू आडवाणी नगर, नटवर पारेख संकुल, सह्याद्री नगर, वाढवली गाव, बीएआरसी वसाहत, डम्पिंग सप्लाय, रफिक नगर, मंडाळा गाव, नवीन मंडाळा, पद्मानगर, विष्णूनगर, एल. यू. गडकरी मार्ग, आरएनए पार्क, कुकरेजा इमारती, महाराष्ट्र नगर, इंडियन ऑइल नगर तसेच बी. डी. पाटील मार्गावरील रिफायनरी विभाग.
एम पश्चिम विभागातील प्रभावित परिसर
मैत्री पार्क, घाटला, चेंबूर गावठाण, सुभाषनगर, सुमननगर, चिखलवाडी, आंबेडकरनगर, वामनवाडी, आनंदनगर, लालडोंगर, सिद्धार्थ वसाहत, स्वस्तिक पार्क, पोस्टल वसाहत, डब्ल्यू. टी. पाटील मार्ग, मुक्तीनगर, काशीनाथ पाटील वाडी, संतोषनगर, केळकरवाडी, डायमंड उद्यान, सेंट्रल अव्हेन्यू मार्ग, एन. बी. पाटील मार्ग, जनार्दन पाटील मार्ग, घाटला गाव, एन. जी. आचार्य मार्ग, एस. टी. अँथोनी रोड, चंद्रोदय सोसायटी, स. गो. बर्वे मार्ग, चरई गाव आणि बोरला सोसायटी.
याशिवाय चेंबूर कॅम्प, सिंधी कॅम्प, विजय विहार, भक्ती भवन, समर्थनगर, बसंत पार्क, सी. जी. गिडवाणी मार्ग, गांधी बाजार, जनता मार्केट, इंदिरानगर, नवजीवन सोसायटी, गोल्फ क्लब, रामटेकडी, कोकणनगर, गणेशनगर, विजयनगर, सिंधी सोसायटी, जिल्हाधिकारी वसाहत, आर. सी. मार्ग, माहुल गाव, आंबापाडा, म्हैसूर वसाहत, वाशी गाव, वाशी नाका, जिजामाता नगर, जयहिंद नगर, फारूक गल्ली, पटेलनगर, बीपीसीएल, माझगाव डॉक, टाटा पॉवर, बीपीटी आदी परिसरांवरही परिणाम होणार आहे.
भक्ती पार्क, टिळकनगर, ठक्करबाप्पा वसाहत, पेस्तम सागर, सहकारनगर, श्रमजीवी नगर, शेल वसाहत, पी. एल. लोखंडे मार्ग, रमाबाई वसाहत, अमीरबाग, कादरिया नगर, महात्मा फुले नगर, अजंठा वसाहत, मुकुंदनगर, पंजाबी चाळ, नागेवाडी आणि छेडानगर या परिसरातील पाणीपुरवठाही प्रभावित होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128