[t4b-ticker]
ब्रेकिंग

महापौर निवासस्थानी अमृता फडणवीस यांनी घेतले बाप्पाचे दर्शन

महापौर रितू तावडे यांच्या कुटुंबीयांकडून पारंपरिक स्वागत; पर्यावरणपूरक सजावटीचे केले कौतुक

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी/मुंबई :

गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांनी मंगळवारी (१५ सप्टेंबर) भायखळा येथील महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट देत श्रीगणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी बाप्पाची आरती करून सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.

महापौर सौ. रितू राजेश तावडे यांच्या निवासस्थानी अमृता फडणवीस यांचे आगमन होताच तावडे कुटुंबीयांच्या वतीने त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी महापौर निवासस्थानी करण्यात आलेल्या गणेश सजावटीची पाहणी केली. शाडू मातीपासून साकारलेली सुबक गणेशमूर्ती तसेच पर्यावरणपूरक सजावटीचे त्यांनी विशेष कौतुक केले.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या या सदिच्छा भेटीत तावडे कुटुंबीय आणि अमृता फडणवीस यांच्यात काही काळ संवादही झाला. उत्सवातील भक्तिमय वातावरणात महापौर निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने गणरायाची आराधना करण्यात आली.

यावेळी महापौर सौ. रितू तावडे यांच्यासह त्यांचे पती श्री. राजेश तावडे, सुपुत्र यश, कन्या मधुरा, कुटुंबीय तसेच भाविक उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128