[t4b-ticker]
ब्रेकिंग

मुंबईत उद्या पाणी कपात! २० तासांच्या देखभाल कामामुळे शहर, पूर्व-पश्चिम उपनगरांना फटका

पांजरापूर उदंचन केंद्रातील उच्चदाब नियंत्रण पॅनेल बदलण्याचे काम; काही भागांत १५ टक्के पाणीपुरवठा कमी होण्याची शक्यता, महापालिकेचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

मुंबई | प्रतिनिधी
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाकडून पांजरापूर येथील मुंबई-३ अ उदंचन केंद्रातील ६.६ के.व्ही. उच्चदाब नियंत्रण पॅनेल बदलण्याचे महत्त्वपूर्ण काम मंगळवार, २८ जुलै रोजी हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी उदंचन केंद्र सलग २० तास बंद ठेवावे लागणार असल्याने शहर विभाग, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरातील काही भागांत पाणीपुरवठ्यात सुमारे १५ टक्के कपात होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
महापालिकेनुसार, २८ जुलै रोजी सकाळी ९ वाजल्यापासून २९ जुलै रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत देखभाल आणि अद्ययावतीकरणाचे काम सुरू राहणार आहे. या कालावधीत पांजरापूर येथून भांडुप जलशुद्धीकरण केंद्राकडे होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याने मुंबईतील काही भागांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत १० जुन्या उच्चदाब नियंत्रण पॅनेलच्या जागी अत्याधुनिक आणि अधिक कार्यक्षम १० नवीन पॅनेल बसविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ४ उच्चदाब नियंत्रण पॅनेल बदलण्याचे काम केले जाणार आहे. भविष्यातील पाणीपुरवठा अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि अखंड ठेवण्यासाठी हे काम अत्यावश्यक असल्याचे जल अभियंता विभागाने सांगितले.
महापालिकेने नागरिकांना आवश्यकतेनुसार पाणी साठवून ठेवावे, पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि या कालावधीत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128