[t4b-ticker]
ब्रेकिंग

एका आईचा हात… दुसऱ्या आईसाठी पुढे सरसावला

रिक्षा मिळेना; नवजात कन्येला महापौर रितू तावडे यांच्या वाहनातून मिळाला पहिला घरचा प्रवास

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी/मुंबई :

पावसाच्या सरी, सोबत जोरदार वारा… हातात अवघ्या काही तासांची नवजात कन्या आणि घरी जाण्यासाठी रिक्षेची प्रतीक्षा. तब्बल तासभर वाट पाहूनही रिक्षा मिळत नसल्याने आई-वडिलांची चिंता वाढली होती. मात्र, याच क्षणी एका आईच्या मदतीला दुसरी आई धावून आली आणि नवजात चिमुकलीचा पहिलाच घरचा प्रवास अविस्मरणीय ठरला.
घाटकोपर येथील संत मुक्ताबाई रुग्णालयाबाहेर आज सायंकाळी हा भावनिक प्रसंग घडला. रुग्णालयातील पाहणी दौरा आटोपून बाहेर पडत असताना मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला. समोर बाळाला कुशीत घेऊन उभी असलेली आई आणि तिच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून महापौरांनी तातडीने तिची विचारपूस केली.
परिस्थिती समजताच महापौरांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीचा हात पुढे केला. “रिक्षा मिळत नसेल तर माझ्या वाहनातून घरी चला,” असा दिलासा देत त्यांनी बाळंतिणीला आणि तिच्या नवजात कन्येला आपल्या महापौर वाहनातून घरी पाठविण्याचा निर्णय घेतला.
महापौर स्वतः त्या चिमुकलीला कुशीत घेऊन वाहनातून खैरानी मार्ग, कुर्ला येथील तिच्या घरापर्यंत पोहोचल्या. घरी पोहोचल्यानंतर त्यांनी नवजात कन्येला आईच्या स्वाधीन केले, प्रेमाने तिचे स्वागत केले आणि आईला शुभेच्छा देत बाळाला भरभरून आशीर्वाद दिला.

रुग्णालयातून जन्मानंतर पहिल्यांदाच घराच्या दिशेने निघालेल्या या चिमुकलीचा पहिला प्रवास रिक्षा किंवा खासगी वाहनातून नव्हे, तर थेट मुंबईच्या महापौरांच्या वाहनातून झाला. त्यामुळे हा प्रसंग त्या कुटुंबासाठी भावनिक आणि आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला.
महापौरांच्या या संवेदनशील कृतीचे स्थानिक नागरिकांनीही कौतुक केले. पदाची प्रतिष्ठा बाजूला ठेवून एका गरजू आईच्या अडचणीच्या क्षणी मदतीला धावून जाण्याची ही कृती माणुसकीचा वेगळाच आदर्श ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
‘कन्या हीच शक्ती’ आणि ‘माणुसकी हाच धर्म’ हा संदेश देणाऱ्या या प्रसंगाने महापौर रितू तावडे यांच्या संवेदनशीलतेची झलक पुन्हा एकदा दाखवून दिली. मोठेपण पदात नसते, ते मनात असते—आणि एका नवजात कन्येच्या पहिल्या प्रवासात आज या मोठेपणाचा प्रत्यय मुंबईकरांना आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128