[t4b-ticker]
ब्रेकिंग

गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकला ब्रेक

गणेशोत्सवापासून अनंत चतुर्दशीपर्यंत मेट्रो-लोकल सेवा सुरळीत ठेवण्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे निर्देश

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

 

प्रतिनिधी, मुंबई,

: गणेशोत्सवात मुंबईकरांच्या प्रवासाला वेग आणि दिलासा मिळणार आहे. गणेश दर्शनासाठी घराबाहेर पडणाऱ्या लाखो भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मेट्रोच्या फेऱ्या वाढविण्यासोबतच रात्री उशिरापर्यंत सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर गणेशोत्सवापासून अनंत चतुर्दशीपर्यंत मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर नियमित मेगाब्लॉक तसेच रात्रकालीन ब्लॉक टाळण्याचे निर्देश कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले आहेत.
गणेशोत्सवात मुंबई आणि उपनगरांतील गणेश मंडळांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक घराबाहेर पडतात. त्यामुळे मेट्रो स्थानकांसह रेल्वे स्थानकांवरही प्रचंड गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेऊन गर्दीच्या वेळेत मेट्रोच्या दोन फेऱ्यांमधील अंतर अर्थात ‘हेडवे’ कमी करून अधिक फेऱ्या चालविण्याचे नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच रात्री गणेश दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांसाठी मेट्रोची शेवटची फेरी उशिरापर्यंत सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार मध्यरात्रीपर्यंत विशेष फेऱ्या चालविण्याची तयारीही करण्यात यावी, असे निर्देश आहेत.
मेगाब्लॉकला ब्रेक
गणेशोत्सवाच्या काळात मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांवर प्रवाशांचा मोठा ताण असतो. त्यात मेगाब्लॉक किंवा रात्रकालीन ब्लॉक झाल्यास प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या प्रारंभापासून अनंत चतुर्दशीपर्यंत मुख्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर नियमित मेगाब्लॉक तसेच रात्रकालीन ब्लॉक घेऊ नये, अशा स्पष्ट सूचना मंत्री लोढा यांनी दिल्या आहेत.
याशिवाय गणेश दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत बाहेर असलेल्या भाविकांना सुरक्षितपणे घरी परतता यावे, यासाठी अतिरिक्त उपनगरीय विशेष लोकल फेऱ्या चालविण्याचे नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे.
रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढणार
गणेशोत्सवातील गर्दी लक्षात घेऊन प्रमुख रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन, प्रवाशांची सुरक्षितता आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळण्यासाठी विशेष यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तिकीट व्यवस्था पूर्ण क्षमतेने सुरू
भाविकांना तिकीट काढताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मेट्रोवरील सर्व तिकीट काऊंटर, ऑटोमेटिक तिकीट व्हेंडिंग मशिन्स (ATVM), डिजिटल आणि क्यूआर तिकीट प्रणाली मेट्रोची शेवटची फेरी होईपर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे.
मेट्रो स्थानकांवरील लिफ्ट, एस्केलेटर, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि प्राथमिक उपचार केंद्रे सेवा सुरू असेपर्यंत उपलब्ध ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
गर्दीच्या मेट्रो स्थानकांवर अतिरिक्त कर्मचारी
गर्दीच्या आणि प्रमुख मेट्रो स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा रक्षक तसेच क्राऊड मॅनेजमेंट कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये होणारे बदल, वेळापत्रक आणि प्रवाशांसाठी आवश्यक सूचना डिस्प्ले बोर्ड, उद्घोषणा यंत्रणा आणि अधिकृत सोशल मीडिया माध्यमांद्वारे वेळोवेळी प्रसारित करण्यात याव्यात, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
‘भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा’
“गणेशोत्सव हा मुंबईकरांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा मोठा सण आहे. या काळात लाखो भाविक गणेश दर्शनासाठी रेल्वे, मेट्रो आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. त्यामुळे भाविकांना कोणताही त्रास होऊ नये आणि त्यांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत व वेळेत व्हावा, यासाठी सर्व वाहतूक यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. गर्दीमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी मेट्रो आणि रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त सेवा, सुरक्षा व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी करावी,” असे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128