[t4b-ticker]
ब्रेकिंग

महापौरांच्या सोशल मीडिया खर्चाबाबत महापालिकेचा खुलासा

महापौरांच्या सोशल मीडिया हाताळणीसाठी स्वतंत्र २५ लाखांचा खर्च नाही संपूर्ण महापालिकेच्या सोशल मीडिया व्यवस्थेसाठी नियुक्त संस्थेमार्फतच तांत्रिक मनुष्यबळाचा पुरवठा

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी/मुंबई,

: महापौरांच्या प्रसिद्धीसाठी २५ लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याच्या वृत्तांमुळे निर्माण झालेल्या गैरसमजावर बृहन्मुंबई महानगरपालिकेने बुधवारी स्पष्टीकरण दिले. महापौर कार्यालयाच्या सोशल मीडिया हाताळणीसाठी स्वतंत्रपणे कोणतीही संस्था नियुक्त करण्यात आलेली नसून, हा खर्च संपूर्ण महापालिकेच्या सोशल मीडिया व्यवस्थेसाठी नियुक्त असलेल्या संस्थेच्या कार्यक्षेत्रातील असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेची myBMC यासह विविध सोशल मीडिया माध्यमे कार्यरत आहेत. या माध्यमांचे तांत्रिक व्यवस्थापन, हाताळणी आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने दोन वर्षांपूर्वी विहित निविदा प्रक्रियेद्वारे मेसर्स रनटाईम सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची नियुक्ती केली आहे.
संपूर्ण महापालिकेच्या सोशल मीडिया व्यवस्थेसाठी या संस्थेला ऑगस्ट २०२६ ते जुलै २०२७ या कालावधीसाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव यापूर्वीच स्थायी समितीने मंजूर केला आहे. याच नियुक्त संस्थेमार्फत महापौर कार्यालयासाठीही आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येते आणि सोशल मीडिया हाताळला जातो.
महत्त्वाचे म्हणजे, महापौरांनी सोशल मीडिया किंवा प्रसिद्धीच्या कामासाठी कोणत्याही स्वतंत्र संस्थेची नियुक्ती करण्याची सूचना केलेली नाही. तसेच महापौरांच्या प्रसिद्धीसाठी स्वतंत्रपणे २५ लाख रुपयांचा खर्च करण्याचा निर्णय झालेला नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले.
त्यामुळे महापालिकेच्या संपूर्ण सोशल मीडिया व्यवस्थेसाठी असलेल्या खर्चाचा संबंध केवळ महापौरांच्या प्रसिद्धीशी जोडणे वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. उपलब्ध वस्तुस्थितीच्या आधारेच वृत्तांकन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128