[t4b-ticker]
ब्रेकिंग

लालबाग परिसरात ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत मोठी कारवाई

लालबागमध्ये ‘पादचारी प्रथम’चा दणका; ६ अनधिकृत दुकाने, ४३ फेरीवाले हटवले

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

२४ ताडपत्री शेड आणि ३ अनधिकृत कट्ट्यांवरही कारवाई; पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी ‘एफ दक्षिण’ विभागाची धडक मोहीम

प्रतिनिधी/मुंबई,

: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लालबाग परिसरातील पदपथांवरील अतिक्रमणांविरोधात मुंबई महानगरपालिकेने धडक कारवाई केली आहे. ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानांतर्गत ‘एफ दक्षिण’ विभागाने आज लालबाग परिसरातील ६ अनधिकृत दुकाने आणि ४३ फेरीवाल्यांचे निष्कासन केले. याशिवाय २४ तात्पुरते ताडपत्रीचे शेड आणि ३ अनधिकृत कट्टे हटविण्यात आले. कारवाईनंतर परिसराची स्वच्छताही करण्यात आली.
माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ‘पादचारी प्रथम’ अभियान राबविण्यात येत आहे. याच अभियानाचा भाग म्हणून लालबाग परिसरात ही कारवाई करण्यात आली.
उपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त (एफ दक्षिण विभाग) वृषाली इंगुले यांच्या नेतृत्वाखाली ही धडक मोहीम राबविण्यात आली. लालबाग परिसरातील मानाचे गणपती तसेच त्यांच्या आसपासचा परिसर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गालगतच्या पदपथांवर अतिक्रमण करून पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली.
गणेशोत्सवाच्या काळात लालबाग परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविक आणि नागरिकांची गर्दी होत असते. त्यामुळे पदपथांवरील अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना होणारा त्रास आणि सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता महापालिकेने ही कारवाई केली आहे. कारवाईदरम्यान काळाचौकी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
महानगरपालिका प्रशासनाने नागरिक आणि व्यावसायिकांना पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे ठेवण्याचे आवाहन केले आहे. पदपथांवर अनधिकृत बांधकामे उभारणे, दुकाने थाटणे अथवा साहित्य ठेवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे टाळावे. अतिक्रमण केल्यास यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128