[t4b-ticker]
ब्रेकिंग

मतदार यादी पुनरिक्षणाला वेग; ३१ ऑगस्टला प्रारूप यादी, नाव गहाळ असल्यास पुन्हा नोंदणीची संधी

मतदार यादी पुनरिक्षणाला वेग; ३१ ऑगस्टला प्रारूप यादी

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

मुंबईतील मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाला निवडणूक आयोगाची मंजुरी; ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

प्रतिनिधी/मुंबई :

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाला वेग आला आहे. भारत निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे मतदारांनी आपले नाव यादीत आहे की नाही, याची तपासणी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
भारत निवडणूक आयोगाकडून १९ ऑगस्ट रोजी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक प्राप्त झाले आहे. त्यानुसार मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांतील सर्व विधानसभा मतदारसंघांमधील मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाच्या प्रस्तावाला २४ ऑगस्ट रोजी आयोगाने मंजुरी दिली आहे.
३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकतींची संधी
३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत मतदारांना यादीतील नावाबाबत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. यासाठी संबंधित विधानसभा मतदारसंघ कार्यालयात अर्ज स्वीकारले जातील.
विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यालयांचे पत्ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर नवीन → विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ → दावे व हरकती → विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यालय पत्त्याची यादी या मार्गाने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
नाव गहाळ? पुन्हा नोंदणीची संधी
प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या किंवा यापूर्वी मतदार यादीतून नाव वगळण्यात आलेल्या नागरिकांसाठीही ही महत्त्वाची संधी आहे. अशा नागरिकांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत नमुना ६ भरून आणि आवश्यक कागदपत्रे सादर करून मतदार म्हणून पुन्हा नोंदणी करता येणार आहे.
१८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांनाही संधी
१ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांनाही या कालावधीत मतदार यादीत नाव नोंदवता येणार आहे. संबंधितांनी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरदरम्यान नमुना ६ भरून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा.
दरम्यान, Unmapped मतदार, Anomalies असलेले मतदार तसेच दावे-हरकती दाखल करणाऱ्या मतदारांना संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतर सुनावणी घेऊन दावे-हरकतींचा निपटारा केला जाईल. ही प्रक्रिया ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पार पडणार आहे.
विशेष सखोल पुनरिक्षणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
मतदारांसाठी महत्त्वाच्या तारखा :
३१ ऑगस्ट २०२६ — प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर — दावे-हरकती दाखल करण्याची मुदत
३० सप्टेंबर — नवीन मतदार नोंदणीची अंतिम संधी
१ ऑक्टोबर — १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना नोंदणीची संधी
२९ ऑक्टोबर — दावे-हरकतींच्या सुनावणीची प्रक्रिया पूर्ण
४ नोव्हेंबर २०२६ — अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128