[t4b-ticker]
ब्रेकिंग

आषाढी एकादशीला ‘प्रतिपंढरपूर’ भक्तिरसात न्हाले;

महापौर रितू तावडे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा, मुंबईच्या समृद्धीसाठी साकडे

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

मुंबई, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त वडाळा येथील मुंबईचे ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शनिवारी पहाटे भक्तिमय वातावरणात महापूजा आणि महाअभिषेकाचा सोहळा पार पडला. मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे आणि त्यांचे पती राजेश तावडे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत पूजा करण्यात आली. मंत्रोच्चार, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’, **’जय हरी विठ्ठल’**च्या अखंड गजराने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
महापूजेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौर रितू तावडे यांनी संपूर्ण मुंबईच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी विठुरायाच्या चरणी प्रार्थना केल्याचे सांगितले. “पंढरपूरला जाणे अनेक मुंबईकरांना शक्य होत नाही. अशा भाविकांसाठी वडाळ्यातील हे मंदिर म्हणजे श्रद्धेचे ‘प्रतिपंढरपूर’ आहे. विठुरायाच्या कृपेने मुंबईच्या विकासाचा वेग अधिक वाढावा, प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात आनंद, शांतता आणि समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना केली,” असे त्यांनी सांगितले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मध्यरात्रीपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात, अभंग, भजन आणि टाळ-मृदुंगाच्या साथीने भक्तांनी विठुरायाच्या दर्शनाचा आनंद लुटला. पहाटेच्या मंगलमय वातावरणात झालेल्या महाअभिषेक आणि महाआरतीने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
या सोहळ्यास एफ-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अरुण क्षीरसागर, श्री विठोबा गणपती आणि महादेव मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष उदय दिघे, सचिव प्रशांत म्हात्रे, खजिनदार नितीन म्हात्रे, सभासद उदय म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भाविकांच्या सुरक्षित आणि सुरळीत दर्शनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका, मंदिर विश्वस्त मंडळ आणि मुंबई पोलिसांनी व्यापक नियोजन केले होते. महापौरांच्या हस्ते महाआरतीनंतर उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या वडाळ्यातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरची अनुभूती देणारा भक्तिसोहळा रंगतो. यंदाही विठ्ठलभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ‘प्रतिपंढरपूर’ भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेच्या रंगात न्हाऊन निघाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128