[t4b-ticker]
ब्रेकिंग

दक्षिण मुंबईला अत्याधुनिक सांस्कृतिक पर्वणी! अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

७६१ आसनक्षमतेचे वातानुकूलित नाट्यगृह, अत्याधुनिक ध्वनी-प्रकाश व्यवस्था; अण्णा भाऊ साठे स्मृतिदालनही आकर्षण

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

मुंबई | प्रतिनिधी
दक्षिण मुंबईच्या सांस्कृतिक वैभवात आणखी एका आधुनिक अध्यायाची भर पडणार असून, भायखळा (पूर्व) येथील लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे नूतनीकरणानंतर शुक्रवार (३१ जुलै) दुपारी २.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या या सोहळ्यामुळे दक्षिण मुंबईला जागतिक दर्जाच्या सुविधांनी सज्ज अत्याधुनिक नाट्यगृह उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान परिसरातील या नाट्यगृहात ७६१ प्रेक्षकांची आसनक्षमता, अत्याधुनिक सराउंड साउंड ध्वनी व्यवस्था, आधुनिक प्रकाशयोजना, २१ मीटर रुंद रंगमंच, ग्रीन रूम, मेकअप रूम, क्रायरूम, डिझेल जनरेटर, सीसीटीव्ही सुरक्षा आणि अत्याधुनिक अग्निशमन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. तळघरात ३२ वाहनांची यांत्रिकी पार्किंग सुविधा असून, प्रेक्षकांसाठी उपाहारगृह आणि स्वतंत्र आरक्षण कार्यालयाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
या नाट्यगृहाच्या तळमजल्यावर उभारण्यात आलेले अण्णा भाऊ साठे स्मृतिदालन हे विशेष आकर्षण ठरणार आहे. येथे अण्णा भाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा, त्यांचे साहित्य, शाहिरी, लावण्या, सुभाषिते, छायाचित्रे आणि सामाजिक संदेशांचे प्रदर्शन करण्यात आले आहे.
या अत्याधुनिक नाट्यगृहामुळे दक्षिण मुंबईतील कलाकार, नाट्यसंस्था आणि सांस्कृतिक चळवळींना आधुनिक व्यासपीठ उपलब्ध होणार असून, शहराच्या सांस्कृतिक पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाची भर पडणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128