[t4b-ticker]
ब्रेकिंग

१५ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी ४ ऑगस्टनंतर; अंतिम मतदार यादी जाहीर होताच कार्यक्रमाची शक्यता

२२ जिल्ह्यांत नव्या ईव्हीएमवर मतदान; आयोगाकडून ६० हजार कंट्रोल युनिटच्या वितरणाला मंजुरी

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

विशेष प्रतिनिधी | मुंबई
राज्यात गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सुमारे १५ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी आता ४ ऑगस्टनंतर सुरू होण्याची चिन्हे आहेत. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तयारीला वेग देत २२ जिल्ह्यांमध्ये नव्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (EVM) वितरणाला मंजुरी दिली आहे. ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होताच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती आयोगातील सूत्रांनी दिली.
आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सुमारे ६० हजार नवीन कंट्रोल युनिट उपलब्ध करून दिली जाणार आहेत. प्रत्येक कंट्रोल युनिटसोबत दोन बॅलेट युनिट दिली जाणार असून ही सर्व यंत्रे इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL), हैदराबाद येथून मागविण्यात येणार आहेत.
अहिल्यानगरला सर्वाधिक, वाशिमला सर्वात कमी ईव्हीएम
जिल्हानिहाय वाटपात अहिल्यानगरला सर्वाधिक ५ हजार कंट्रोल युनिट, तर नाशिकला ४,५००, जळगावला ४ हजार, बीड आणि नांदेडला प्रत्येकी ३,५०० कंट्रोल युनिट मिळणार आहेत. वाशिमला सर्वात कमी १,५०० कंट्रोल युनिट देण्यात येणार आहेत.
४ ऑगस्टला अंतिम मतदार यादी
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी विधानसभा मतदार यादीच आधार असणार आहे. आयोगाच्या वेळापत्रकानुसार २४ जुलै रोजी प्रारूप मतदार यादी, तर ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर तातडीने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
ग्रामीण राजकारण तापणार
ग्रामपंचायत निवडणुकांसोबतच अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा सहकारी बँका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकाही प्रलंबित आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता असून, प्रमुख राजकीय पक्षांसह आजी-माजी आमदार, खासदार आणि मंत्र्यांनीही ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी उमेदवार आणि इच्छुकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128