[t4b-ticker]
ब्रेकिंग

मुंबईत पावसाळ्यात 3,841 ठिकाणी पडलेली झाडे-फांद्या हटवल्या; 542 ठिकाणी काम सुरू

वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यानंतर महापालिकेची तातडीची मोहीम; 24 तास यंत्रणा सज्ज

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

विशेष प्रतिनिधी | मुंबई
मुंबईत गेल्या काही आठवड्यांतील मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळलेली झाडे, तुटलेल्या फांद्या आणि धोकादायक वृक्षांची छाटणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने मोठी मोहीम राबवली आहे. २२ जून ते १७ जुलैदरम्यान तब्बल ३,८४१ ठिकाणी झाडे, फांद्या हटविणे आणि वृक्ष छाटणीची कामे पूर्ण करण्यात आली असून, आणखी ५४२ ठिकाणी काम युद्धपातळीवर सुरू आहे.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, या कालावधीत सार्वजनिक आणि खासगी मिळून ९०२ झाडे उन्मळून पडली, तर १,२७५ फांद्या तुटून कोसळल्या. उद्यान विभागाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बहुतांश ठिकाणी वाहतूक सुरळीत केली आणि नागरिकांची गैरसोय टाळली.
याशिवाय, धोकादायक ठरू शकणाऱ्या २,२०६ ठिकाणी वृक्षछाटणीची आवश्यकता होती. त्यापैकी १,८५७ ठिकाणी काम पूर्ण झाले असून उर्वरित ठिकाणी कार्यवाही सुरू आहे.
महापालिकेने सांगितले की, उद्यान विभागाचे नियंत्रण कक्ष, क्षेत्रीय कार्यालये आणि आपत्कालीन पथके २४ तास कार्यरत असून आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि उपकरणे सज्ज ठेवण्यात आली आहेत. पावसाळाभर अशी मोहीम सुरूच राहणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.
महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, मुसळधार पाऊस किंवा जोरदार वाऱ्याच्या वेळी झाडाखाली उभे राहू नये. तसेच झाड पडल्याची किंवा फांदी तुटून धोकादायक स्थिती निर्माण झाल्याची माहिती तातडीने 1916 या महापालिकेच्या हेल्पलाइनवर द्यावी.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128