वांद्रे लिंक स्क्वेअर मॉलमध्ये लागलेल्या आगीचा चौकशी अहवाल महापालिका आयुक्तांना सादर
चौकशी अहवालाची प्रत महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
प्रतिनिधी मुंबई
दिनांक ११ जून २०२५_
वांद्रे (पश्चिम) स्थित लिंक स्वेअर मॉलला दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी आग लागली होती. या आगीसंदर्भातील चौकशी अहवाल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक. भूषण गगराणी यांना सादर करण्यात आला आहे. या अहवालातील शिफारशी मंजूर करुन पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश . गगराणी यांनी दिले आहेत. चौकशी अहवालाची प्रत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
वांद्रे (पश्चिम) येथील ३३ व्या रस्त्यावरील लिंक स्वेअर मॉलला दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी पहाटे ३ वाजून ५८ मिनिटांनी आग लागली. आगीची खबर मिळाल्यानंतर मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. एकूण २१ तास ४३ मिनिटे इतका कालावधी सातत्याने कार्यरत राहून ही आग पूर्णपणे आटोक्यात आणली.
सदर आगीचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक . भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार सहआयुक्त (दक्षता) श्री. डी. गंगाथरण यांच्या अध्यक्षतेखालील समितीने संपूर्ण चौकशी करुन अहवाल सादर केला. हा अहवाल मंजूर करुन त्याआधारे पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्त महोदयांनी दिले आहेत.
दरम्यान, या चौकशी अहवालाची प्रत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ https://portal.mcgm.gov.in यावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर ‘नवीन’ (New) या सदरामध्ये हा अहवाल पाहता येईल.
*
