[t4b-ticker]
ब्रेकिंग

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत उद्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’

तीन विधानसभा मतदारसंघांत एकाच छताखाली शासनाच्या विविध योजनांचा लाभ; जन्म-मृत्यू दाखल्यांपासून नवमतदार नोंदणी, पेन्शन, शिधापत्रिका आणि इतर सेवाही उपलब्ध

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत उद्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’
तीन विधानसभा मतदारसंघांत एकाच छताखाली शासनाच्या विविध योजनांचा लाभ; जन्म-मृत्यू दाखल्यांपासून नवमतदार नोंदणी, पेन्शन, शिधापत्रिका आणि इतर सेवाही उपलब्ध

मुंबई | प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधत मुंबई शहर जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी विशेष लोकाभिमुख उपक्रम हाती घेतला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ या अभियानांतर्गत बुधवार, २२ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शीव (सायन)-कोळीवाडा, माहीम आणि मलबार हिल या तीन विधानसभा मतदारसंघांत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरांचे वैशिष्ट्य म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार, महसूल विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध योजना व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना विविध कार्यालयांच्या फेऱ्या न मारता अनेक शासकीय सेवांचा लाभ एकाच छताखाली मिळणार आहे.
शिबिरामध्ये जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, विविध दाखले, नवमतदार नोंदणी, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, शिधापत्रिकेशी संबंधित सेवा, मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना, क्रीडा विभागाच्या सुविधा तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क (सेवा हमी) अधिनियमांतर्गत विविध सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
प्रशासनाने मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांना या शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून, विविध शासकीय योजना आणि सेवांचा लाभ सुलभ व जलद पद्धतीने मिळविण्याची ही उत्तम संधी असल्याचे सांगितले आहे.
शिबिरांची ठिकाणे
शीव (सायन)-कोळीवाडा विधानसभा मतदारसंघ : सरदार नगर, शीव (पूर्व) येथील महानगरपालिका शाळेसमोरील समाज मंदिर सभागृह क्रमांक १.
माहीम विधानसभा मतदारसंघ : प्रभादेवी, सयानी मार्ग, श्री सिद्धिविनायक मंदिराजवळील रवींद्र नाट्यमंदिर.
मलबार हिल विधानसभा मतदारसंघ : गावदेवी, गोरेगावकर मार्ग, शारदा मंदिर हायस्कूल (तळमजला).
मुंबईकरांनी या विशेष शिबिरात सहभागी होऊन शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128