[t4b-ticker]
ब्रेकिंग

मुंबईत कुठेही कचऱ्याचे ढीग दिसता कामा नयेत’; कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश

सहायक आयुक्तांना रोज सकाळी स्वच्छता चौक्यांवर हजेरी बंधनकारक; उच्च न्यायालयाच्या निरीक्षणांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा कडक इशारा

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

मुंबई | विशेष प्रतिनिधी
“मुंबईत कुठेही कचऱ्याचे ढीग दिसता कामा नयेत. स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करा.” अशा स्पष्ट शब्दांत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व प्रशासकीय विभागांना कडक आदेश दिले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक वॉर्डाच्या सहायक आयुक्तांनी दररोज सकाळी स्वच्छता चौक्यांना प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मुंबईतील ‘दृश्यमान स्वच्छता’ मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत डॉ. शर्मा यांनी स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाने मुंबईतील स्वच्छतेबाबत गंभीर निरीक्षणे नोंदविली असून, आता प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.
डॉ. शर्मा यांनी निर्देश दिले की, रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, बसथांबे आणि कचरा साचण्याच्या संवेदनशील ठिकाणांची (GVP) रोज तपासणी करून तातडीने स्वच्छता केली जावी. कोणत्याही भागात कचरा साचल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी.
बैठकीत असेही स्पष्ट करण्यात आले की, उच्च न्यायालयाने नियुक्त केलेले पथक कोणत्याही क्षणी आकस्मिक पाहणी करू शकते. त्यामुळे प्रत्येक वॉर्डात स्वच्छता यंत्रणा सतत सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
स्वच्छतेला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांवरही कठोर कारवाई करण्याचे निर्देश देत डॉ. शर्मा यांनी नागरिकांच्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद देण्यास सांगितले. लोकप्रतिनिधी, व्यापारी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून स्वच्छतेची जनजागृती वाढविण्यावरही त्यांनी भर दिला.
बैठकीला सर्व परिमंडळांचे उपायुक्त, सर्व वॉर्डांचे सहायक आयुक्त आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महापालिकेने आता ‘दृश्यमान स्वच्छ मुंबई’ हे लक्ष्य ठेवत रोजच्या स्वच्छता कामांवर थेट देखरेख ठेवण्याचा निर्णय घेतल्याने कामचुकार अधिकाऱ्यांचे धाबे दणाणण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128