[t4b-ticker]
ब्रेकिंग

मुंबईतील काही भागांत गढूळ पाणीपुरवठा; पाणी गाळून आणि उकळूनच पिण्याचे महापालिकेचे आवाहन

पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसाचा परिणाम; जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये उपाययोजना, क्लोरीनचा पुरेसा वापर सुरू

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी

मुंबई
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीपात्रातील पाण्याची गढूळता वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून मुंबईतील पश्चिम उपनगरे आणि शहर विभागातील काही भागांमध्ये गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी म्हणून पाणी गाळून आणि उकळूनच पिण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदीपात्रातून जलशुद्धीकरण केंद्रात येणारे पाणी अधिक गढूळ झाले असून, त्याचा परिणाम काही भागातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे.
महापालिकेच्या जल अभियंता विभागाने गढूळता कमी करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये आवश्यक उपाययोजना सुरू केल्या असून, पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी क्लोरीनचाही पुरेसा वापर केला जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करत, गढूळ पाणी आल्यास ते गाळून आणि उकळूनच वापरावे, अशी सूचना केली आहे. पाण्याची गुणवत्ता पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128