[t4b-ticker]
ब्रेकिंग

३८३ कृत्रिम तलावांत गणेशमूर्तींचे विसर्जन; मुंबईत २५ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची फौज तैनात

६७ नैसर्गिक विसर्जन स्थळांवरही तयारी पूर्ण; गिरगाव चौपाटीवर १२ कृत्रिम तलाव

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

‘एक गणपती, एक झाड’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; ८५ रुग्णवाहिका, १० मोटरबोट आणि ३४ क्रेन सज्ज

प्रतिनिधी/मुंबई :

श्रीगणेशोत्सवाच्या विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईत व्यापक तयारी पूर्ण केली आहे. यंदा ३८३ हून अधिक कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून, सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींसाठी ४४ समुद्रकिनारे व जेट्टी आणि २३ नैसर्गिक तलाव अशा एकूण ६७ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विसर्जनाचा सोहळा सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी तब्बल २५ हजार अधिकारी-कर्मचारी तसेच स्वयंसेवकांची यंत्रणा तैनात राहणार आहे.
माननीय उच्च न्यायालयाच्या २० ऑगस्ट २०२६ रोजीच्या निर्देशांनुसार, जनहित याचिकेवरील अंतिम निर्णय होईपर्यंत २४ जुलै २०२५ रोजीच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यानुसार सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करणे बंधनकारक आहे. नागरिकांनी या व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
‘एक गणपती, एक झाड’चा संकल्प
गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश अधिक व्यापक करण्यासाठी यंदा महापौर रितू तावडे यांच्या संकल्पनेतून ‘एक गणपती, एक झाड’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबईत विसर्जित होणाऱ्या गणेशमूर्तींच्या संख्येइतकी झाडे लावण्याचा महापालिकेचा संकल्प आहे. गणरायाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंतच्या उत्सवाला वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाची जोड देत मुंबई अधिक हिरवीगार करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.


३८३ कृत्रिम तलाव, ६७ नैसर्गिक विसर्जन स्थळे
महापालिका क्षेत्रात २७८ ठिकाणी ३८३ हून अधिक कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींसाठी ६७ नैसर्गिक विसर्जन स्थळे सज्ज करण्यात आली आहेत.
विसर्जन व्यवस्थेसाठी १ हजार १९४ स्टील प्लेट, २३ जर्मन तराफे, ३४ क्रेन, ८५ रुग्णवाहिका, १० मोटरबोट, ४९८ निर्माल्य कलश, ३२६ निर्माल्य डंपर, २६१ स्वागत कक्ष, २२८ नियंत्रण कक्ष आणि ७५ निरीक्षण मनोरे उभारण्यात येणार आहेत. याशिवाय १ हजार १३२ जीवरक्षक, ६ हजार ५२ फ्लडलाईट व सर्चलाईट आणि ४८९ तात्पुरती प्रसाधनगृहे उपलब्ध असतील.
गिरगाव चौपाटीवर विशेष व्यवस्था
मुंबईतील प्रमुख विसर्जन केंद्र असलेल्या स्वराज्यभूमी अर्थात गिरगाव चौपाटीवर विशेष यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. येथे १२ कृत्रिम तलाव, २० निरीक्षण मनोरे, २२ तराफे, ९० प्रसाधनगृहे, २२ निर्माल्य कलश, एक प्राथमिक आरोग्य केंद्र, ५४८ फ्लडलाईट, ११ सर्चलाईट, तीन रुग्णवाहिका आणि सुमारे एक हजार मनुष्यबळ तैनात राहणार आहे.
९४० मेट्रिक टन शाडू मातीचे मोफत वाटप
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांना आतापर्यंत ९४० मेट्रिक टनांहून अधिक शाडू माती मोफत वितरित केली आहे. याशिवाय यंदा मूर्तिकारांना २५ हजार ४०० लिटर पर्यावरणपूरक रंग विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत.


४ हजार २७९ खड्डे बुजवले; २८१ ठिकाणी केबल हटविल्या
विसर्जन मार्गांवरील अडथळे दूर करण्यासाठीही महापालिकेने विशेष मोहीम राबवली आहे. २८१ ठिकाणच्या अडथळा निर्माण करणाऱ्या केबल्स हटविण्यात आल्या असून, ५०६ रस्त्यांवरील ४ हजार २७९ खड्डे आणि १७१ ड्रेनेज कव्हर्सची दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच ५१५ ठिकाणी वृक्षछाटणी पूर्ण करण्यात आली आहे.
समुद्रात उतरताना जेलीफिश, स्टिंग रेपासून सावध
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर ‘ब्ल्यू बटन जेलीफिश’ आणि ‘स्टिंग रे’ प्रजातींचा वावर आढळत असल्याने नागरिकांनी समुद्रात विसर्जन करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
मंडळांच्या स्वयंसेवकांना आपत्कालीन प्रशिक्षण
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील किमान ८ ते १० स्वयंसेवकांना महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून एकदिवसीय प्रथम प्रतिसादक आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले आहे. गर्दीचे नियोजन, विद्युत अपघात, आग, आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती, प्रथमोपचार आणि सीपीआर याबाबत स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले.
महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षित, पर्यावरणपूरक, स्वच्छ आणि शिस्तबद्ध पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन उपआयुक्त (परिमंडळ तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128