[t4b-ticker]
ब्रेकिंग

भायखळा राणीबागेत ‘टनेल अॅक्वेरियम’च्या कामाला गती

जानेवारी २०२७ पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश; ५० प्रजातींच्या जास्वंद प्रदर्शनाचे अवलोकन

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी/मुंबई :

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील विविध विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी बुधवारी प्रकल्पस्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी उद्यानातील ‘टनेल अॅक्वेरियम’च्या बांधकामाचा आढावा घेत जानेवारी २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

आयुक्त भिडे यांनी उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या जास्वंद प्रदर्शनालाही भेट दिली. या प्रदर्शनात जास्वंदाच्या विविध रंगांच्या सुमारे ५० प्रजाती नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या आकर्षक प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन विविध प्रजातींचा आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

‘एक पेड माँ के नाम’अंतर्गत वृक्षारोपण

दरम्यान, ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयुक्त भिडे यांच्या हस्ते उद्यान परिसरात ‘सेंच्युरी पाम’ वृक्षाची लागवड करण्यात आली.

उद्यानातील विविध प्रकल्प, विकासकामे आणि उपक्रमांची माहिती घेताना भिडे यांनी कामांची गुणवत्ता आणि निर्धारित वेळेत पूर्तता करण्यावर भर देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपआयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी, संचालक (प्राणिसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128