[t4b-ticker]
ब्रेकिंग

मुंबईतील गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा; महापालिका मुख्यालयात ‘महापौर वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष’ सुरू,

आठवडाभरात मदतीचे लक्ष्य

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

विशेष प्रतिनिधी | मुंबई
मुंबईतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गंभीर आजारांशी झुंज देणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने मिळावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या धर्तीवर महापालिका मुख्यालयात ‘महापौर वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजहिताचा उपक्रम म्हणून मंगळवारी महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार अमित साटम यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, आर्थिक अडचणीमुळे कोणताही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. यामुळे गरजू रुग्णांना आवश्यक आर्थिक सहाय्य कमी कालावधीत उपलब्ध होणार असून उपचार प्रक्रियेलाही गती मिळणार आहे.
थेट रुग्णालयालाच निधी; आठवडाभरात मदतीचा प्रयत्न
या कक्षामार्फत पात्र रुग्णांच्या अर्जांची छाननी करून मंजुरीनंतर उपचारासाठीची आर्थिक मदत थेट संबंधित रुग्णालयाच्या नावाने धनादेशाद्वारे दिली जाणार आहे. त्यामुळे निधीचा योग्य वापर सुनिश्चित होईल आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळतील. शक्यतो एका आठवड्याच्या आत मदत उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
कर्करोग, हृदयविकार, यकृत, मेंदू व बालरुग्णांना प्राधान्य
महापौर वैद्यकीय सहाय्यता निधीतून कर्करोग, हृदयविकार, यकृत, मेंदूचे आजार, बालरुग्णांच्या गंभीर शस्त्रक्रिया तसेच इतर गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पात्र रुग्णांना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
दहा रुग्णांना धनादेशांचे वाटप; आमदार अमित साटम यांची देणगी
उद्घाटन सोहळ्यात दहा गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना महापौर वैद्यकीय सहाय्यता निधीचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच आमदार अमित साटम यांनी या निधीसाठी २५ हजार रुपयांचा धनादेश महापौर रितू तावडे यांच्याकडे सुपूर्द केला.
या कार्यक्रमाला उपमहापौर संजय घाडी, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, सभागृह नेते गणेश खणकर, विविध समित्यांचे अध्यक्ष, नगरसेवक, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, येत्या काळात हा सहाय्यता निधी अधिक सक्षम करून त्याची व्याप्ती वाढविण्यात येणार असून मुंबईतील अधिकाधिक गरजू रुग्णांना वेळेत आणि प्रभावी वैद्यकीय आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128