ब्रेकिंग
श्री गजानन महाराजांच्या नित्य पादुकापूजन व दर्शन सोहळ्याचे गिरगावात आयोजन
भाविकांना उपस्थितीचे नगरसेवक गिरी यांचे आवाहन
[wps_visitor_counter]
[responsivevoice_button voice="Hindi Female"]
[metaslider id="1367"]

मुंबई | प्रतिनिधी
श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य गुरुपरंपरेतील तेजोमय अवतार परमहंससद्गुरु श्री गजानन महाराज यांच्या नित्य पादुकांचे पूजन व दर्शन सोहळ्याचे आयोजन रविवार, २७ जुलै रोजी गिरगाव येथे करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुण्यलाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हा कार्यक्रम गिरगाव येथील ४ था मजला, रूम क्र. ४६, स्वकृपादीप निवास, गोपीर रोड, गिरगाव (प.), मुंबई – ४००००४ येथे आयोजित करण्यात आला आहे. दिवसभर भाविकांना श्रींच्या नित्य पादुकांचे पूजन, दर्शन तसेच भक्तिमय वातावरणात धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेता येणार आहे.
आयोजकांच्या माहितीनुसार, श्रीस्वामी समर्थांच्या भक्तांसाठी हा सोहळा श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा पर्व ठरणार असून, मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी नगरसेवक श्री. धर्मेश भूपत गिरी (प्रभाग क्र. १७०), सदस्य – आरोग्य समिती यांनी शुभेच्छा दिल्या असून, सर्व भाविकांनी या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]