[t4b-ticker]
ब्रेकिंग

मुंबईच्या प्रदूषणावर महापालिकेचा ‘ॲक्शन प्लॅन’; प्रत्येक वॉर्डात १० हॉटस्पॉटवर नजर

बांधकामस्थळे, रस्त्यावरील धूळ, राडारोडा, कचरा जाळणे आणि वाहनांच्या धुरावर थेट कारवाई

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]


नियमभंग करणाऱ्यांवर कामबंदीपासून सील करण्यापर्यंतची कारवाई

प्रतिनिधी/मुंबई :

मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘वायू प्रदूषण नियंत्रण व अंमलबजावणी कृती आराखडा-२०२६’ लागू केला आहे. शहरातील प्रदूषणाच्या प्रमुख स्रोतांवर थेट नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक प्रशासकीय विभागात किमान १० वायू प्रदूषण हॉटस्पॉट निश्चित करून त्यांची अद्ययावत यादी व नकाशा तयार केला जाणार आहे. या हॉटस्पॉटवर जबाबदार अधिकारी नियुक्त करून नियमित देखरेख आणि कारवाई केली जाणार आहे.
महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आणि महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागीय सहायक आयुक्तांना या कृती आराखड्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हॉटस्पॉटमध्ये मोठी बांधकामे व पुनर्विकास प्रकल्प, पायाभूत सुविधांची कामे, खुले कचरा जाळण्याची ठिकाणे, राडारोडा टाकण्याची ठिकाणे तसेच वाहतूक कोंडीची ठिकाणे यांचा समावेश केला जाणार आहे.
बांधकामस्थळांवर दररोज तपासणी
बांधकाम आणि पाडकामस्थळांवरील धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यमान २८ कलमी मार्गदर्शक तत्त्वांची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रत्येक पथकाने दररोज किमान दोन बांधकामस्थळांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नियमांचे उल्लंघन आढळल्यास कारणे दाखवा नोटीस, कामबंदीची नोटीस आणि आवश्यकतेनुसार बांधकामस्थळ सील करण्याची कारवाई केली जाणार आहे. पाडकामाच्या वेळी योग्य बॅरिकेडिंग, ताडपत्री किंवा हिरव्या कापडाने परिसर झाकणे आणि सातत्याने सूक्ष्म जलफवारणी करणे बंधनकारक राहणार आहे.


प्रकल्पाच्या आकारानुसार रस्त्यांची जबाबदारी
बांधकामस्थळालगतच्या रस्त्यांवरील धूळ आणि चिखल हटवण्याची जबाबदारी संबंधित विकासक किंवा कंत्राटदारावर टाकण्यात आली आहे. ४ हजार चौरस मीटरपर्यंतच्या प्रकल्पाला १०० मीटर, ४ हजार ते १० हजार चौरस मीटर प्रकल्पाला २०० मीटर, तर १० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या प्रकल्पाला दोन्ही बाजूंना ५०० मीटरपर्यंतचा रस्ता स्वच्छ ठेवावा लागणार आहे.
ऑक्टोबरमध्ये ‘डीप क्लीनिंग ड्राइव्ह’
पावसाळ्यानंतर रस्त्यांवर साचलेला गाळ, चिखल आणि धूळ हटवण्यासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यांत ‘पोस्ट-मॉन्सून डीप क्लीनिंग ड्राईव्ह’ राबवला जाणार आहे. प्रमुख रस्ते, दुभाजक, चौक आणि रस्त्यांच्या कडांची विशेष स्वच्छता केली जाईल. गरजेनुसार पुनर्वापराच्या पाण्याने रस्ते धुणे, पाण्याची सूक्ष्म फवारणी आणि मिस्टिंग केले जाणार आहे.
राडारोडा वाहणाऱ्या वाहनांवरही नजर
बांधकाम व पाडकामाचा राडारोडा वाहून नेणारी वाहने पूर्णपणे झाकलेली असणे बंधनकारक करण्यात आले आहे. सार्वजनिक रस्त्यावर येण्यापूर्वी वाहनांच्या चाकांची स्वच्छता करावी लागणार आहे. राडारोड्याच्या वाहतूक आणि विल्हेवाटीवर Mumbai Debris Control and Tracking System (MDCTS) द्वारे नियंत्रण ठेवले जाणार आहे.
रेडी मिक्स काँक्रिटच्या वाहनांमधून काँक्रिट किंवा अन्य सामग्री रस्त्यावर सांडणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई; धूर सोडणाऱ्या वाहनांची पीयूसी तपासणी
मुंबईतील मोकळ्या जागेत कचरा जाळण्याच्या घटनांवर महापालिका आता अधिक कठोर नजर ठेवणार आहे. प्रभागस्तरीय मार्शल्स आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून अशा घटनांचे निरीक्षण केले जाईल.
प्रमुख वाहतूक मार्ग आणि वाहतूक कोंडीच्या ठिकाणी विशेष पीयूसी तपासणी मोहीम राबवली जाणार असून दृश्यमान धूर सोडणाऱ्या वाहनांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
AQI २०० पार झाल्यास अतिरिक्त उपाय
वायू गुणवत्ता निर्देशांकावर सातत्याने लक्ष ठेवून परिस्थितीनुसार Graded Response Action Plan (GRAP) अंतर्गत अतिरिक्त उपाययोजना केल्या जाणार आहेत. AQI २०० पेक्षा अधिक झाल्यास संबंधित परिसरात सखोल स्वच्छता, रस्ते धुणे, पाण्याची फवारणी, मिस्टिंग आणि खुल्या जागेत कचरा जाळण्यावर कठोर नियंत्रण आणले जाणार आहे.
एखाद्या ठिकाणी AQI सलग तीन दिवस ३०० पेक्षा अधिक राहिल्यास त्या स्थानकाच्या २ किलोमीटर परिसरातील प्रदूषणकारी कामे बंद करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबईतील हवा अधिक स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा प्रभागस्तरावर नियमित आढावा घेतला जाणार आहे. वायू प्रदूषणाच्या प्रमुख स्रोतांवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह आवश्यक ती अंमलबजावणीची कारवाई करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128