[t4b-ticker]
ब्रेकिंग

गांधी जयंतीला मुंबईत स्वच्छतेचा संदेश; महापौरांसह लोकप्रतिनिधींचा सहभाग

स्वच्छता हीच सेवा’ अभियानात मुंबईच्या विविध भागांत स्वच्छता मोहिमा; महापौर रितू तावडे यांनी हातात झाडू घेऊन केली रस्त्याची स्वच्छता

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी/मुंबई :

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत गुरुवारी ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहर आणि उपनगरांतील विविध भागांत आयोजित स्वच्छता मोहिमांमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा, पंकजा मुंडे, महापौर रितू तावडे यांच्यासह आमदार, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, अधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले.
गांधीजींच्या स्वच्छतेच्या विचारांना अभिवादन करण्यासोबतच स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम न राहता नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनावी, या उद्देशाने महापालिकेने विविध ठिकाणी स्वच्छता उपक्रम राबवले.
महापौरांनी हातात घेतला झाडू
घाटकोपर पूर्वेतील प्रभाग क्रमांक १३२ मध्ये झालेल्या विशेष स्वच्छता मोहिमेत महापौर रितू तावडे सहभागी झाल्या. या वेळी त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन रस्त्याची स्वच्छता केली आणि नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. स्वच्छतेचा संदेश देणारे पथनाट्यही यावेळी सादर करण्यात आले.
मणीभवनपासून जुहू, वांद्रेपर्यंत स्वच्छता मोहीम
मणीभवन परिसरातील स्वच्छता मोहिमेत मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले. जुहू समुद्रकिनारी आमदार अमित साटम यांनी स्वच्छता केली. पी (पूर्व) विभागातील धन्जीवाडी येथील खोडियाल माता मंदिर परिसरातील मोहिमेत आमदार अतुल भातखळकर सहभागी झाले.
वांद्रे येथील बँडस्टॅंड परिसरातील स्वच्छता मोहिमेत अभिनेता महेश मांजरेकर यांनी सहभाग घेतला. याशिवाय विविध ठिकाणी आमदार, नगरसेवक, स्थानिक लोकप्रतिनिधी, महापालिकेचे परिमंडळ उपआयुक्त आणि सहायक आयुक्त यांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
अभियानात आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमीन पटेल, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्ष मीनल तुर्डे आदींसह अनेक लोकप्रतिनिधी सहभागी झाले. स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेच्या विचारांचा वारसा पुढे नेत मुंबई स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ महापालिकेची नसून प्रत्येक नागरिकाची आहे, हा संदेश या अभियानातून देण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128