[t4b-ticker]
ब्रेकिंग

मुंबईकरांच्या बाप्पासाठी महिला बचत गटांचे मोदक घरपोच!

मोदक महोत्सव २०२६’ला सुरुवात; उकडीचे आणि तळलेले मोदक ऑनलाइन मागवता येणार, १४ सप्टेंबरपासून घरपोच सेवा

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

विशेष प्रतिनिधी | मुंबई

गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू झाली असून, बाप्पाच्या नैवेद्याच्या ताटातील मानाचा पदार्थ असलेला मोदक आता मुंबईकरांना घरबसल्या मागवता येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रोत्साहन दिल्या जाणाऱ्या महिला बचत गटांनी तयार केलेले उकडीचे आणि तळलेले मोदक यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईकरांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेने ‘मोदक महोत्सव २०२६’ आयोजित केला आहे.

महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल तुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. १४ सप्टेंबरपासून संपूर्ण गणेशोत्सव काळात मुंबईकरांना मोदकांची घरपोच सुविधा उपलब्ध राहणार आहे.

फक्त एका दिवसाची ऑनलाइन नोंदणी

मोदक मागविण्यासाठी मुंबईकरांना shgeshop.com या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. नागरिकांनी मोदक हव्या असलेल्या दिवसाच्या किमान एक दिवस आधी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर मोदकांची घरपोच सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

ही सेवा केवळ मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उपलब्ध राहणार असून संपूर्ण गणेशोत्सव कालावधीत ‘मोदक महोत्सव’ सुरू राहणार आहे.

बाप्पासाठी उकडीचेही, तळलेलेही मोदक

गणेशोत्सवात मोदकांना मोठी मागणी असते. ही मागणी लक्षात घेऊन महापालिकेच्या अर्थसहाय्याने चालणाऱ्या महिला बचत गटांकडून उकडीचे आणि तळलेले अशा दोन्ही प्रकारचे मोदक तयार केले जाणार आहेत.

त्यामुळे बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरगुती चवीचे मोदक उपलब्ध होण्याबरोबरच मुंबईकरांना महिला बचत गटांच्या उत्पादनांना थेट प्रोत्साहन देण्याची संधी मिळणार आहे.

मोदकांच्या माध्यमातून महिलांना बाजारपेठ

महापालिकेकडून मुंबईतील महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, व्यवसायाला चालना मिळावी आणि उत्पन्नाच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने विविध व्यवसायाभिमुख उपक्रम हाती घेतले जात आहेत.

याच प्रयत्नांचा भाग म्हणून ‘मोदक महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून महिला बचत गटांनी तयार केलेले मोदक मुंबईकरांच्या घरापर्यंत पोहोचणार असून, गणेशोत्सवाचा आनंद आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन अशी दुहेरी संधी या उपक्रमातून मिळणार आहे.

मुंबईकरांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन

महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मुंबईकरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि गणरायाच्या नैवेद्यासाठी महिला बचत गटांनी तयार केलेले मोदक खरेदी करून त्यांच्या उद्योगाला हातभार लावावा, असे आवाहन महापालिकेच्या नियोजन विभागाकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128