Breaking
राजकिय

मुंबई महापालिका निवडणुका दिवाळीत होण्याची शक्यता

प्रभाग रचना अंतिम करण्यासाठी निवडणूक आयोगाची अधिसूचना

0 0 2 1 1 7

प्रतिनिधी ,मुंबई

१३ मे २०२५

गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अखेर यंदाच्या दिवाळीत मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात नुकतीच प्रभाग रचना अधिसूचना काढली असून ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुका या दिवाळी दरम्यानच होतील अशी दाट शक्यता आहे.
मुंबई महापालिका निवडणुका प्रभाग रचने करिता राज्य निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार प्रगनक गटाची मांडणी करण्यासाठी 11 जून ते 16 जून 2025 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर 18 जून पर्यंत जनगणनेची प्राप्त माहिती तपासण्यात येणार आहे 23 जून पर्यंत स्थळ पाहणी करण्यात येणार असून त्यानंतर 30 जून २०२५ पर्यंत गुगल मॅप वर प्रभागाचे नकाशे तयार करण्यात येणार आहेत. नकाशावर निश्चित केलेल्या प्रभाग हद्दी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तीन जुलै पर्यंत तपासण्यात येणार आहे तर ७ जुलै 2025 रोजी प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीच्या स्वाक्षऱ्या होणार आहेत. त्यानंतर 10 जुलै पर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. 31 जुलै पर्यंत प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहेत तर 11 ऑगस्ट पर्यंत हरकती सूचनांवर सुनावणी घेण्यात येणार आहे. 18 ऑगस्ट पर्यंत सुनावणी हरकतीवरील सूचना शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाला मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे. तर 4 सप्टेंबर 2025 पर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचने द्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यानंतरच मुंबई महापालिका निवडणुकीची अधिसूचना जारी होण्याची शक्यता असून ही निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

पालिकानामा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 1 1 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे