[t4b-ticker]
ब्रेकिंग

मुंबईत अतिक्रमणावर मोठी कारवाई; ९२ अनधिकृत स्टॉल हटवले

साबू सिद्दिक मार्ग, मुसाफिरखाना आणि मनीष मार्केट परिसरात महापालिकेची धडक मोहीम; ७५० चौरस फुटांच्या गोदामावरही कारवाई

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

मुंबई | प्रतिनिधी

मुंबईतील पादचाऱ्यांचे मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेने बुधवारी मोठी कारवाई केली. ए विभागातील साबू सिद्दिक मार्ग, मुसाफिरखाना आणि मनीष मार्केट परिसरातील ९२ अनधिकृत स्टॉल हटविण्यात आले. या कारवाईत ताडपत्री, बांबू, लोखंडी पाइप आणि लोखंडी पत्र्यांच्या साहाय्याने उभारलेले तात्पुरते बांधकाम तसेच पक्के लोखंडी स्टॉल निष्कासित करण्यात आले. याशिवाय ७५० चौरस फुटांच्या एका गोदामावरही कारवाई करण्यात आली.

महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या संकल्पनेतील ‘पादचारी प्रथम’ मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा लवंगारे यांच्या आदेशानुसार आणि परिमंडळ-१ च्या उपायुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली १४ ऑक्टोबर रोजी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली.

लोकप्रतिनिधींच्या पाहणीनंतर कारवाई

उपायुक्त चंदा जाधव यांनी सांगितले की, १३ ऑक्टोबर रोजी लोकप्रतिनिधींसमवेत साबू सिद्दिक मार्ग आणि मुसाफिरखाना परिसराची पाहणी करण्यात आली होती. या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना अतिक्रमण हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी ९२ अनधिकृत स्टॉल हटविण्यात आले.

या मोहिमेत ए विभागाचे सहाय्यक आयुक्त उज्ज्वल इंगोले यांच्यासह परिरक्षण, अनुज्ञापन आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामध्ये तीन पोलीस निरीक्षक, तीन फौजदार आणि ३० पोलीस अंमलदारांचा समावेश होता.

या कारवाईमुळे संबंधित परिसरातील अनधिकृत स्टॉल हटवून पादचाऱ्यांसाठी मार्ग मोकळे करण्यास आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यास मदत होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128