[t4b-ticker]
ब्रेकिंग

मुंबईत अनधिकृत बॅनर-पोस्टरवर पालिकेचा धडाका; २,२४८ फलक हटवले

१३ प्रकरणांत पोलिसांत तक्रार; ४ प्रकरणांत एफआयआर दाखल

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

मुंबई, प्रतिनिधी
मुंबईतील अनधिकृत राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक जाहिरातबाजीविरोधात महापालिकेने कारवाईचा धडाका लावला आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार, ८ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत शहरातील तब्बल २,२४८ अनधिकृत बॅनर, पोस्टर आणि जाहिरात फलक हटवण्यात आले आहेत. या प्रकरणी १३ ठिकाणी संबंधितांविरोधात पोलिसांत तक्रारी करण्यात आल्या असून, चार प्रकरणांत थेट एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि व्यावसायिकांकडून सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणाऱ्या अनधिकृत जाहिरात साहित्याविरोधात पालिकेने ही मोहीम राबवली. केवळ बॅनर आणि पोस्टर हटवण्यापुरती कारवाई मर्यादित न ठेवता, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईचाही मार्ग अवलंबण्यात येत आहे.

सहा दिवसांत हजारो जाहिरात साहित्य हटवले
८ ऑक्टोबर रोजी ४१२ अनधिकृत बॅनर, २४४ फलक आणि २० पोस्टर हटवण्यात आले. ९ ऑक्टोबर रोजी ३०२ बॅनर, १४३ फलक आणि २८ पोस्टरवर कारवाई करण्यात आली. १० ऑक्टोबर रोजी २११ बॅनर, ६९ फलक आणि १६ पोस्टर हटवण्यात आले.
१२ ऑक्टोबर रोजी २४३ बॅनर, १२२ फलक आणि ४८ पोस्टर हटवण्यात आले. तर १३ ऑक्टोबर रोजी २४४ बॅनर, ९५ फलक आणि २१ पोस्टरवर कारवाई करण्यात आली.
अनधिकृत जाहिरात साहित्य हटवण्यासोबतच संबंधितांविरोधात पोलिसांत तक्रारी आणि एफआयआर दाखल करण्यात आल्याने, नियमबाह्य बॅनरबाजी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128