[t4b-ticker]
ब्रेकिंग

शाळांमध्ये रोबोटिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे मनपा शाळांमध्ये आता रोबोटिक्स, कोडिंगचे धडे

आयआयटी मुंबईत ५० शिक्षक-अधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा; ड्रोन, रोबोटिक्सच्या प्रात्यक्षिकांसह आधुनिक शिक्षणावर भर

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी/मुंबई :

बृहन्मुंबई महानगरपालिका (मनपा) शाळांमधील विद्यार्थ्यांना आता रोबोटिक्स, कोडिंग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक ज्ञान मिळणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, नवोन्मेषाची वृत्ती आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्याबरोबरच त्यांना भविष्यातील तंत्रज्ञानासाठी तयार करण्याच्या उद्देशाने मनपाने आयआयटी मुंबईच्या सहकार्याने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात मनपाच्या ५० शिक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी, २९ सप्टेंबर रोजी आयआयटी मुंबईला भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञान आणि रोबोटिक्स शिक्षणाची माहिती घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच शाळांमध्ये रोबोटिक्स आणि कोडिंगसारखे विषय प्रात्यक्षिक पद्धतीने कसे शिकवता येतील, यावरही चर्चा झाली.
मनपा आयुक्त अश्विनी भिडे आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला.
‘ई-यंत्र’ प्रकल्पाची माहिती
आयआयटी मुंबईतील प्रा. डॉ. कवी आर्य आणि प्रा. डॉ. शिवराम कल्याणकृष्णन यांनी शिक्षकांना आयआयटी मुंबईच्या महत्त्वाकांक्षी ‘ई-यंत्र’ प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. रोबोटिक्स आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये तर्कशक्ती, समस्या सोडविण्याची क्षमता आणि नवकल्पनांना चालना मिळू शकते, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता, जिद्द आणि काहीतरी नवीन करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात आहे. या क्षमतांना योग्य तांत्रिक व्यासपीठ मिळाल्यास विद्यार्थी भविष्यात स्वतःचा उद्योग किंवा स्टार्टअप सुरू करण्याच्या दिशेनेही पुढे जाऊ शकतात, असे प्रा. कवी आर्य यांनी सांगितले.
ड्रोनपासून रोबोटपर्यंत प्रात्यक्षिक
अभ्यास दौऱ्यात शिक्षक आणि अधिकाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यामध्ये ड्रोन, अल्फाबॉट लाईन फॉलोइंग यासह विविध रोबोटिक्स प्रकल्पांचा समावेश होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून तंत्रज्ञान कसे शिकविता येईल, याची शिक्षकांना माहिती मिळाली.
याशिवाय ‘लॅब-इन-अ-बॉक्स’ या संकल्पनेचेही प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. कमी साधनसामग्रीत शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची प्रयोगशाळा कशी उभारता येईल, याचे प्रत्यक्ष मॉडेल शिक्षकांना दाखविण्यात आले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीवर चर्चा
शिक्षक आणि आयआयटीच्या तज्ज्ञांमध्ये ‘ओपन हाऊस’ सत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मनपा शाळांमध्ये प्रभावीपणे कसे राबविता येईल, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक आनंददायी आणि प्रयोगाधारित कसे करता येईल, तसेच शालेय शिक्षणात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करता येईल, यावर सविस्तर चर्चा झाली.
आयआयटीचे मार्गदर्शन यापुढेही सुरू राहणार
आयआयटी मुंबई आणि मनपा यांच्यातील समन्वय यापुढेही कायम राहणार आहे. मनपा शाळांमध्ये रोबोटिक्स, कोडिंग आणि इतर प्रगत तंत्रज्ञानावर आधारित प्रात्यक्षिक उपक्रम नियमितपणे राबविण्यात येणार आहेत. आयआयटी मुंबईचे प्राध्यापक आणि तज्ज्ञ विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही मार्गदर्शन करणार आहेत.
यामुळे मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना पारंपरिक अभ्यासक्रमासोबतच भविष्यातील तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळणार असून, नवोन्मेष आणि उद्योजकतेच्या दिशेने त्यांना नवी संधी उपलब्ध होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128