[t4b-ticker]
ब्रेकिंग

विलेपार्ल्यात १२ मजली इमारतीला भीषण आग; दोन जणांचा मृत्यू, चौघे जखमी

११व्या मजल्यावर रात्री उशिरा लागलेल्या आगीने खळबळ; अडीच वर्षांच्या चिमुरड्यासह तरुणीचा दुर्दैवी अंत

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी/मुंबई :

विलेपार्ले पश्चिम येथील बाप्टिस्टा रोडवरील शांताभवन इमारतीच्या ११व्या मजल्यावर मंगळवारी रात्री भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत अडीच वर्षांच्या चिमुरड्यासह २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला असून अन्य चार जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नानावटी रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, चर्च रोडवरील सेंट झेवियर स्कूलजवळ असलेल्या ग्राउंड अधिक १२ मजली शांताभवन इमारतीच्या ११व्या मजल्यावर रात्री १० वाजून २ मिनिटांनी आग लागल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाने रात्री १०.०८ वाजता आगीची पातळी लेव्हल-१ घोषित केली. मात्र आग वाढत असल्याने अवघ्या आठ मिनिटांत म्हणजे रात्री १०.१६ वाजता ती लेव्हल-२ घोषित करण्यात आली.
आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, संबंधित वीज वितरण कंपनी, १०८ रुग्णवाहिका आणि महापालिकेच्या संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. अखेर मध्यरात्री १२.२५ वाजता आग नियंत्रणात आणण्यात आली.
दरम्यान, नानावटी रुग्णालयात एकूण सहा जखमी दाखल झाल्याची माहिती देण्यात आली. त्यापैकी अडीच वर्षांचा अबीर आणि २३ वर्षीय अंकिता यांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. तर पार्थ (३२), हिरण (६४), यशस्वी आणि अभिषेक या चौघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
रात्रीच्या वेळी ११व्या मजल्यावर लागलेल्या आगीमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128