[t4b-ticker]
ब्रेकिंग

अंधेरीत ३४ हजार चौ. फुटांवरील अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा!

डीआरएम मोटर्स, डीआरएम अपारेल्स आणि चित्रकूट बँक्वेट हॉलवर ‘के पश्चिम’ विभागाची धडक कारवाई;

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी/ मुंबई :

अंधेरीतील चित्रकूट मैदान परिसरात अनधिकृत बांधकामांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेने सोमवारी मोठी कारवाई केली. डीआरएम मोटर्स, डीआरएम अपारेल्स आणि चित्रकूट बँक्वेट हॉलच्या तब्बल ३४ हजार चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत बांधकामावर पालिकेने हातोडा चालवत ते निष्कासित केले. उच्च न्यायालयाने संबंधित बांधकामाविरोधातील याचिका फेटाळल्यानंतर पालिकेने ही कारवाई केली.
चित्रकूट मैदानस्थित या बांधकामांबाबत पालिकेच्या वतीने संबंधित शाह कन्स्ट्रक्शन कंपनीला नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, कंपनीने या नोटीसीला उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने संबंधित याचिका फेटाळल्यानंतर पालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाचा कारवाईचा मार्ग मोकळा झाला.
त्यानंतर सोमवारी पालिकेच्या पथकाने प्रत्यक्ष कारवाई करत डीआरएम मोटर्स, डीआरएम अपारेल्स आणि चित्रकूट बँक्वेट हॉलशी संबंधित सुमारे ३४ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम निष्कासित केले. विविध संयंत्रांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.

उपायुक्त (परिमंडळ-४) भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त (के पश्चिम) चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. इमारत व कारखाना विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.
कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आंबोली पोलीस ठाण्याचा पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
उच्च न्यायालयाचा दिलासा नाही; पालिकेची कारवाई
संबंधित बांधकामाविरोधात पालिकेने बजावलेल्या नोटीसीला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, न्यायालयाने याचिका फेटाळल्याने पालिकेने पुढील कार्यवाही करत अनधिकृत बांधकाम हटविले. त्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात न्यायालयीन प्रक्रियेनंतरही कारवाई थांबणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128