[t4b-ticker]
ब्रेकिंग

गोवंडीत महापालिकेची नवी इंग्रजी शाळा

अनधिकृत शाळांतील विद्यार्थ्यांना प्रवेशात प्राधान्य

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी/मुंबई :

गोवंडीतील विद्यार्थ्यांसाठी महापालिकेने इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शिवाजी नगर शाळा संकुल क्रमांक-४ येथे नव्याने उभारलेल्या इमारतीत ‘मुंबई पब्लिक स्कूल, शिवाजी नगर इंग्रजी शाळा क्र. ०१’ सुरू करण्यात आली असून ज्युनियर केजी ते चौथीपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गोवंडी व परिसरातील अनधिकृत शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशात प्राधान्य दिले जाणार आहे.

महाराष्ट्र बोर्डाचा अभ्यासक्रम

नवीन शाळेत महाराष्ट्र राज्य मंडळाचा अभ्यासक्रम शिकविला जाणार असून सुरुवातीला ज्युनियर केजी, वरिष्ठ केजी तसेच पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि अधिकृत शालेय शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.

प्रवेश मर्यादित; पालकांना आवाहन

शाळेतील प्रवेशसंख्या मर्यादित असल्याने इच्छुक पालकांनी विलंब न करता प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका शिक्षण विभागाने केले आहे. विशेषतः अनधिकृत शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

येथे साधा प्रवेश अर्ज

पत्ता : पहिला मजला, मुंबई पब्लिक स्कूल, शिवाजी नगर शाळा संकुल क्रमांक-४, बाजीप्रभू देशपांडे मार्ग, शिवाजी नगर मार्केटजवळ, गोवंडी (पश्चिम), मुंबई-४०००४३.

इच्छुक पालकांनी वरील पत्त्यावर प्रत्यक्ष संपर्क साधून प्रवेशासंदर्भातील माहिती घ्यावी, असे महापालिका शिक्षण विभागाने कळविले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128