[t4b-ticker]
ब्रेकिंग

मतदार यादीत नाव नसेल तर ३० सप्टेंबरपर्यंत संधी; राजकीय पक्षांनी मतदारांना कागदपत्रांसह पुढे आणावे

SIR-२०२६ च्या कामाचा आढावा; अश्विनी भिडेंचे आवाहन — दावे-हरकतींच्या प्रक्रियेत प्रशासनाला सहकार्य करण्याचे पक्षांना आवाहन

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

मुंबई | प्रतिनिधी :
मतदार यादीत नाव नाही, नाव किंवा नोंदीमध्ये काही त्रुटी आहे अथवा मतदार म्हणून हक्काबाबत आक्षेप नोंदवायचा आहे, तर मुंबईकरांसाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे-हरकती दाखल करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी केवळ निवडणुकीच्या काळात मतदारांशी संपर्क न साधता, आत्ताच त्यांच्यापर्यंत पोहोचून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)-२०२६ कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक गुरुवारी (३ सप्टेंबर) महापालिका मुख्यालयात झाली. या बैठकीत मुंबईतील SIR प्रक्रियेबाबत प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती सादर करण्यात आली. बृहन्मुंबई क्षेत्रातील सुरू असलेल्या प्रक्रियेबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले.

BLOच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन

SIR प्रक्रियेत आतापर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात BLO यांच्या गृहभेटी, गणना पत्रांचे वाटप व संकलन, माहितीचे डिजिटायझेशन, प्रारूप मतदार यादीचे प्रकाशन तसेच मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण या महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.

आता ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर या कालावधीत प्राप्त दावे-हरकतींचा निपटारा करण्यात येणार असून, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

‘नाव वगळले जाऊ नये’ यासाठी पक्षांचीही जबाबदारी

बैठकीत अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले की, SIRची संपूर्ण प्रक्रिया विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी (ERO), सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO), पर्यवेक्षक, BLO आणि मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) यांच्या समन्वयाने निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

मात्र, मतदार यादी अचूक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी राजकीय पक्षांची भूमिकाही महत्त्वाची आहे. राजकीय पक्षांनी त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधावा, त्यांना योग्य मार्गदर्शन करावे आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे भिडे यांनी सांगितले.

४ नोव्हेंबरला अंतिम यादी

मुंबईतील मतदारांना आपले नाव प्रारूप मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नाव नसल्यास किंवा नोंदीबाबत आक्षेप असल्यास ३० सप्टेंबरपूर्वी दावा अथवा हरकत दाखल करणे आवश्यक आहे. प्राप्त दावे-हरकतींच्या निपटाऱ्यानंतर ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे.

या बैठकीस अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महापालिका आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे, डॉ. विपिन शर्मा, अभिजीत बांगर, सहआयुक्त विश्वास शंकरवार तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

SIR-२०२६च्या माध्यमातून मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असताना, एकही पात्र मतदार मतदार यादीबाहेर राहू नये, यासाठी प्रशासनासोबतच राजकीय पक्षांनीही सक्रिय भूमिका बजावण्याची अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128