[t4b-ticker]
ब्रेकिंग

बालवाडी शिक्षिका-मदतनीसांचा ८ ऑक्टोबरला आझाद मैदानात धरणे आंदोलन

संस्थांचा मनमानी कारभार बंद करून बालवाड्या महापालिकेने चालवाव्यात; किमान वेतन, ईएसआयसी-ईपीएफसह दिवाळीत एका वेतनाची ‘भाऊबीज भेट’ देण्याची मागणी

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी/मुंबई :

मुंबई महानगरपालिकेच्या बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबईच्या वतीने ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. वेतनातील अनियमितता, किमान वेतनाचा प्रश्न आणि सामाजिक सुरक्षेच्या लाभांपासून वंचित ठेवल्याचा आरोप करत युनियनने आंदोलनाची हाक दिली आहे. ही माहिती म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहाय्यक सरचिटणीस अरुण नाईक यांनी दिली.
आरोग्य अभिरुचीअंतर्गत घेण्यात आलेल्या संस्थांकडून मनमानी कारभार केला जात असून अनेकदा बालवाडी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन दिले जात नाही, असा आरोप नाईक यांनी केला. त्यामुळे संबंधित संस्था रद्द करून मुंबईतील सर्व बालवाड्या थेट महानगरपालिकेमार्फत चालविण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
किमान वेतनानुसार पगारवाढ
बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांना किमान वेतनानुसार पगारवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सर्व बालवाडी शिक्षिका व मदतनीसांना ईएसआयसी आणि ईपीएफचे सर्व लाभ आणि सेवासवलती देण्यात याव्यात, अशीही मागणी आहे.
दिवाळीत एका वेतनाची ‘भाऊबीज भेट’
यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांना एका वेतनाएवढी रक्कम ‘भाऊबीज भेट’ म्हणून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय मुंबई महानगरपालिकेच्या बालवाडी शिक्षिका व मदतनीसांना गणवेश आणि ओळखपत्र देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
‘संस्था मालक नाहीत, घाबरू नका’
न्याय्य मागण्या आणि हक्कांसाठी सर्व बालवाडी शिक्षिका व मदतनीसांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन युनियनने केले आहे. “संस्था आपल्या मालक नाहीत, त्यांना न घाबरता सामील व्हा. लढेंगे तो ही जितेंगे,” असा संदेश देत कर्मचाऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आंदोलनाच्या माध्यमातून बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांच्या वेतन, सामाजिक सुरक्षा आणि सेवासवलतींचे प्रश्न प्रशासनासमोर तीव्रपणे मांडण्यात येणार असल्याचे अरुण नाईक यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128