[t4b-ticker]
ब्रेकिंग

गरजू रुग्णांसाठी आरक्षित खाटा किती? धर्मादाय रुग्णालयांना माहिती फलक बंधनकारक आयुष्मान कार्डधारकांकडून अतिरिक्त कागदपत्रे मागू नका

मुंबईतील प्रमुख रुग्णालयांत जनऔषधी केंद्रांसाठी जागा देण्याचे निर्देश

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]


प्रतिनिधी/मुंबई :

धर्मादाय रुग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांसाठी आरक्षित असलेल्या खाटांची माहिती आता रुग्णालयाच्या दर्शनी भागात ठळकपणे प्रदर्शित करावी लागणार आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या विविध आरोग्य योजनांची माहिती देणारे फलकही रुग्णालयांमध्ये लावण्याचे निर्देश केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात गुरुवारी केंद्र सरकारच्या विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत जाधव यांनी मुंबईतील आरोग्य सुविधांचा आढावा घेताना केंद्राच्या योजनांचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचे निर्देश दिले.
आयुष्मान कार्ड असेल तर अतिरिक्त कागदपत्रांची सक्ती नको
महापौर रितू तावडे यांनी आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थी रुग्णांच्या बाबतीत महत्त्वाचे निर्देश दिले. आयुष्मान कार्डधारक रुग्णांकडून उपचारासाठी इतर ओळखपत्रे किंवा अतिरिक्त कागदपत्रांची सक्ती करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. या निर्देशाची महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये तातडीने अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले.
महापालिका रुग्णालयांत जनऔषधी केंद्रे
मुंबईतील महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये जनऔषधी केंद्रांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही जाधव यांनी केली. त्यामुळे रुग्णांना रुग्णालयाच्या परिसरातच परवडणाऱ्या दरात जेनेरिक औषधे उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
कॅन्सर तपासणीसाठी AIचा वापर
बैठकीत आरोग्य क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर चर्चा झाली. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना, NACOFच्या माध्यमातून जेनेरिक औषध केंद्रे, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, महापालिकेत प्रोटॉन थेरपी सेंटर उभारणे तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्भाशय, स्तन आणि मुखाच्या कर्करोगाची प्राथमिक तपासणी करण्याच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.
याशिवाय अत्याधुनिक आयुष दवाखाना, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर महिलांसाठी मानसिक आरोग्य सेवा, राष्ट्रीय आरोग्य निधी, रुग्णालयांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्रे आणि सौरऊर्जा प्रकल्प यावरही चर्चा झाली.
महाराष्ट्रासाठी केंद्राचा जास्तीत जास्त निधी मिळवा
केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांसाठी उपलब्ध असलेला तांत्रिक आणि आर्थिक निधी महाराष्ट्राला जास्तीत जास्त मिळवून द्यावा, तसेच मंजूर निधीचा वेळेत आणि प्रभावीपणे विनियोग करावा, असे आवाहन जाधव यांनी केले. केंद्राच्या योजनांचा लाभ थेट गरजू रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीला उपमहापौर संजय घाडी, खासदार रवींद्र वायकर, खासदार डॉ. ज्योती वाघमारे, शिवसेना गटनेते अमेय घोले, सुधार समिती अध्यक्ष संध्या दोषी-सक्रे, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदिर्गे, विविध समित्यांचे अध्यक्ष, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांच्यासह राज्य शासन व महापालिकेचे अधिकारी आणि विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128