Breaking
ब्रेकिंग

वांगणीत विकासाचा ग्राहकांना हजार कोटींचा चुना

फसवणूक झालेल्या नागरिकांचा मंत्रालयात मोर्चा

0 0 2 1 1 7

प्रतिनिधी, मुंबई

२८ जून २०२५

सर्वसामान्य आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांना घरांचे स्वप्न दाखवून हजार कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप करीत नागरिकांनी शुक्रवारी थेट मंत्रालयातच मोर्चा काढला. गृहनिर्माण विभागाच्या वतीने संबंधित प्रकरणाची दखल घेत कारवाई करण्याची संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
वांगणी येथे एक्सबेरिया डेव्हलपर्स या राहुल नहार यांच्या मालकीच्या कंपनीने सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे देण्याची योजना सुमारे दहा वर्षांपूर्वी आणली. आवाक्यातील घरे असल्याने मजूर आणि कामगार वर्गातील हजारो नागरिकांनी या प्रकल्पात घरांची नोंदणी केली. मात्र दहा वर्षानंतर प्रकल्पाचे काम जैसे थे असून नागरिकांना घरी मिळालेली नाहीत मात्र या प्रकल्पासाठी विविध बँकातून नागरिकांनी कर्ज घेतले असल्याने आणि संबंधित बँकांनी कर्जाची 90% रक्कम विकासकाला दिली असल्याने नागरिकांकडून बँकांची हप्ते वसुली सुरू असल्याचा आरोप या प्रकल्पातील ग्राहक स्नेहा वाडकर यांनी केला आहे. या प्रकल्पात आपण 16 लाख रुपये किमतीचा टू बीएचके फ्लॅट बुक केला होता. मात्र गेल्या दहा वर्षात काहीही प्रगती झाली नसून बँकेकडून मात्र भरमसाठ व्याजदराने हप्ते वसुली होत आहे. आमची फसवणूक झाली असून या संदर्भात शासनाने कारवाई करावी अशी मागणी वाडकर यांना केली आहे. तर या प्रकल्पातील कंत्राटदाराला दोन कोटी रुपयांचे बिल अदा न केल्याने प्रकरण एनसीएलटी मध्ये दाखल झाले आहे. प्रकल्प गंगाजळी काढण्यात यावा असा प्रयत्न विकासकांकडून सुरू असल्याने सर्वसामान्य आणि गरीब ग्राहकांचे पैसे बुडवण्याचा त्याचा डाव असल्याचा आरोप आरती चौधरी यांनी केला आहे.

काय आहे प्रकल्प?

वांगणी येथे परवडणारी घरे या संकल्पनेखाली एक्सपेरिया डेव्हलपर ने 47 इमारतींचा प्रकल्प प्रस्तावित केला. या प्रकल्पामध्ये 162 चौरस फूट ते 275 चौरस फुटाची घरे बांधण्यात येणार होती. त्यासाठी सहा लाख रुपयांपासून ते 25 लाख रुपयांपर्यंतची किंमत ठरवण्यात आली होती. सुमारे पाच हजार सातशे घरांच्या या प्रकल्पासाठी 1700 कोटी रुपये अंदाजीत खर्च अपेक्षित होता. या प्रकल्पासाठी मोठ्या संख्येने नोंदणी झाल्यानंतर विकासकामे पुढे बांधकाम केले नाही आणि नागरिकांची फसवणूक केली असल्याचा आरोप करीत या नागरिकांनी शुक्रवारी गृहनिर्माण विभागात मोर्चा काढला. यावेळी संबंधित विकासकाची योग्य चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन गृह विभागाकडून देण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

पालिकानामा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 1 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे