[t4b-ticker]
ब्रेकिंग

पवई  जलाशयामधून २३ जून पासून होणार पाणीपुरवठा

एल’ आणि ‘एस’ विभागातील नागरिकांनी पुढील ४ दिवस पाणी उकळून व गाळून प्‍यावे

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी मुंबई

१९ जून २०२५_

पवई निम्‍नस्‍तर जलाशयाच्‍या संरचनात्‍मक दुरूस्‍तीचे काम बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने सुरू केले आहे. या अंतर्गत कप्‍पा क्रमांक २ चे संरचनात्‍मक दुरूस्‍ती काम पूर्ण झाले आहे. आता कप्‍पा क्रमांक १ च्‍या संरचनात्‍मक दुरूस्‍तीचे काम सुरू करण्‍यात येणार आहे. संरचनात्‍मक दुरूस्‍ती केलेल्‍या पवई निम्‍नस्‍तर जलाशयाच्‍या कप्‍पा क्रमांक २ मधून सोमवार, दिनांक २३ जून २०२५ पासून पाणीपुरवठा केला जाणार आहे.

त्‍या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्‍हणून सोमवार, दिनांक २३ जून २०२५ नंतर पुढील ३ ते ४ दिवस ‘एल’ व ‘एस’ विभागातील नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्‍यावे, असे नम्र आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्‍यात येत आहे.

*‘एल’ विभाग –* पाणीपुरवठा परिक्षेत्र (कुर्ला उत्तर परिक्षेत्र) : बरेली मशीद, ९० फुटी मार्ग कुर्ला-अंधेरी मार्ग, जरीमरी, घाटकोपर-अंधेरी जोडरस्ता (लिंक रोड), सावरकर मार्ग, महात्मा फुले नगर, तानाजी नगर, साकी विहार मार्ग, मारवाह उद्योग मार्ग, सत्यनगर पाईपलाईन मार्ग *(नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सकाळी ६.०० ते दुपारी २.०० वा.)*

*‘एल’ विभाग –* पाणीपुरवठा परिक्षेत्र (कुर्ला दक्षिण परिक्षेत्र) : काजूपाडा, गणेश मैदान, इंदिरानगर, संगम वसाहत, शास्त्रीनगर, घास कंपाऊंड, ख्रिश्चन गांव, मसरानी गल्ली, गाझी मिया दर्गा मार्ग, ए. एच. वाडिया मार्ग, वाडिया इस्टेट, एम. एन. मार्ग, बैलबाजार, संदेश नगर, क्रांती नगर, लाल बहादूर शास्त्री (एल. बी. एस.) मार्ग, कमानी, कल्पना सिनेमागृह, किस्मत नगर, गफूर खान इस्टेट, संभाजी चौक, न्यू मील मार्ग, रामदास चौक, ईगलवाडी, आण्णासागर मार्ग, ब्राह्मण वाडी, पटेल वाडी, स. गो. बर्वे मार्ग, बुद्ध कॉलनी, एल. आय. जी. – एम. आय. जी. कॉलनी, विनोबा भावे नगर, एच. डी. आय. एल. संपूर्ण संकुल, नौपाडा, प्रीमिअर वसाहत, सुंदरबाग, शिव टेकडी, संजय नगर, कपाडिया नगर, रुपा नगर, तकिया विभाग, मॅच फॅक्टरी गल्ली, शिवाजी कुटीर गल्ली, टॅक्सीमन वसाहत, इंदिरा नगर, महाराष्ट्र काटा, लाल बहादूर शास्त्री (एल. बी. एस.) मार्ग, चाफे गल्ली – चुनाभट्टी, सेवक नगर, विजय नगर, जरीमरी माता मंदीर परिसर *(नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी ६.३० ते सकाळी ८.५० वा.)*

*‘एस’ विभाग –* पाणीपुरवठा परिक्षेत्र (कुर्ला दक्षिण परिक्षेत्र) : मोरारजी नगर, भीमनगर, पासपोली गावठाण, लोकविहार वसाहत, रेनेसेन्स हॉटेल परिसर *(नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी ६.३० ते सकाळी ८.५० वा.)*

कृपया संबंधित भागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाणी उकळून – गाळून प्‍यावे व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128