[t4b-ticker]
ब्रेकिंग

पादचारी प्रथम’चा धडाका; मुंबईतील १३४ पदपथ अतिक्रमणमुक्त, १९७ किमी मार्ग मोकळा

पहिल्या टप्प्यात १,४५९ ठिकाणी कारवाई; भांडुप स्टेशन परिसरातील ९४ अनधिकृत स्टॉल्सवर हातोडा

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी/मुंबई, 

: मुंबईकरांच्या पायवाटेवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात महापालिकेने आता थेट कारवाईचा धडाका सुरू केला आहे. ‘पादचारी प्रथम’ अभियानाच्या पहिल्या टप्प्यात शहरातील २०० पदपथांपैकी १३४ पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यात आले असून तब्बल १९७ किलोमीटरचा पदपथांचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. या मोहिमेत आतापर्यंत १,४५९ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी अभियानाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. प्रत्येक प्रशासकीय विभागातील कारवाईचा त्या स्वतः आढावा घेत आहेत. मुंबईतील पदपथ नागरिकांसाठी सुरक्षित, सुकर आणि अडथळामुक्त करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

भांडुप स्टेशन परिसरात ९४ स्टॉल्सवर कारवाई

पादचारी वर्दळीचे प्रमुख ठिकाण असलेल्या भांडुप रेल्वे स्थानकाच्या पश्चिम परिसरात गेल्या दोन दिवसांत ९४ अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली. पहिल्या टप्प्यात भांडुप परिसरातील १४ पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याचे नियोजन असून त्यापैकी सुमारे ११ पदपथांवरील कारवाई सुरू झाली आहे.

या कारवाईमुळे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या आणि स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी पदपथ मोकळा झाला आहे. गर्दीच्या वेळेतील पादचारी आणि वाहतूक कोंडी कमी होण्यासही यामुळे मदत होणार आहे. भांडुप स्थानक परिसरातून लालबहादूर शास्त्री मार्गाच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांनाही आता अधिक मोकळा मार्ग मिळणार आहे.

५ जेसीबी, १० डंपर; ७० पोलिसांसह मोठा फौजफाटा

भांडुपमधील कारवाईसाठी ५ जेसीबी, १० डंपर, ५० हून अधिक अधिकारी-कर्मचारी, १०० कामगार आणि ७० हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले. अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपआयुक्त संतोषकुमार धोंडे आणि सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

मुंबईतील सर्व २६ विभागांत अभियान

‘पादचारी प्रथम’ अभियान महापालिकेच्या सर्व २६ विभागांत राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात २०० पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी १३४ पदपथांवरील काम हाती घेण्यात आले असून १९७ किलोमीटरचा मार्ग अडथळामुक्त करण्यात आला आहे.

‘पदपथ तुमच्या मालकीचे नाहीत’—महापालिकेचा इशारा

महापालिकेने व्यावसायिक आणि नागरिकांना पदपथांवर अनधिकृत दुकाने, स्टॉल्स, बांधकामे किंवा साहित्य ठेवून पादचाऱ्यांचा मार्ग अडवू नये, असे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.

दरम्यान, ‘एस’ विभागाकडून ‘पादचारी प्रथम’सोबतच कचरा साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांचे (GVPs) निर्मूलन करण्यासाठीही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे अतिक्रमणासोबतच सार्वजनिक जागेवरील अस्वच्छतेवरही महापालिकेने कारवाईचा फोकस वाढवला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128