[t4b-ticker]
ब्रेकिंग

मुंबईच्या मतदार यादीचा ‘रिव्हिजन’ सुरू; प्रारूप यादी प्रसिद्ध

नाव गायब असेल तर ३० सप्टेंबरपर्यंत संधी; ४ नोव्हेंबरला अंतिम यादी

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी/मुंबई :

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या सोमवारी, ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपले नाव आणि मतदार यादीतील नोंदी तपासणे आवश्यक आहे. यादीत नाव नसेल, चुकीची नोंद असेल किंवा नाव वगळले गेले असेल, तर ३० सप्टेंबरपर्यंत दावा किंवा हरकत दाखल करता येणार आहे.
नाव नसेल तर ‘नमुना ६’ भरा
प्रारूप मतदार यादीत पात्र नागरिकाचे नाव नसेल, तर आवश्यक कागदपत्रांसह नमुना ६ भरून मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे. विशेष म्हणजे, १ ऑक्टोबर २०२६ रोजी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांनाही ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत नमुना ६ भरून मतदार म्हणून नोंदणी करण्याची संधी देण्यात आली आहे.
याशिवाय प्रारूप यादीतून पात्र मतदाराचे नाव वगळले गेले असल्यास, संबंधित नागरिकानेही विहित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करून नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
घरबसल्या यादी तपासता येणार
विधानसभा मतदारसंघनिहाय आणि भागनिहाय प्रारूप मतदार याद्या मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मतदारांनी यादीत आपले नाव, पत्ता आणि इतर नोंदी तपासाव्यात. नोंदीमध्ये त्रुटी आढळल्यास किंवा नावाबाबत आक्षेप असल्यास संबंधित विधानसभा मतदारसंघ कार्यालयात दावा अथवा हरकत दाखल करता येईल.
मृत, स्थलांतरित आणि दुबार मतदारांची स्वतंत्र यादी
प्रारूप मतदार यादीत समाविष्ट न करता आलेल्या गैरहजर, स्थलांतरित, मृत, दुबार तसेच इतर मतदारांची (ASDDO) स्वतंत्र यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांना ही यादी तपासण्याची सुविधा देण्यात आली आहे.
याशिवाय मतदार नोंदीशी जुळवणी न झालेले **‘Unmapped’ मतदार आणि विसंगती असलेले ‘Anomalies

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128